शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडव्यापासून ‘दगडूशेठ’ चा संगीत महोत्सव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 20:44 IST

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित संगीत महोत्सवाची सुरुवात १८ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता भिमण्णा जाधव व सहका-यांच्या मंगलध्वनी, सुंद्रीवादनाने होणार आहे.

ठळक मुद्दे गुढीपाडव्याला सकाळी ९ वाजता मंदिरामध्ये गुढीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.गणेश कला क्रीडा मंच येथे दररोज सायंकाळी ७ ते १० यावेळेत विविध दर्जेदार सांगितिक कार्यक्रमांची होणार

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडवा ते रामनवमीदरम्यान १८ ते २५ मार्च पर्यंत संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे दररोज सायंकाळी ७ ते १० यावेळेत विविध दर्जेदार सांगितिक कार्यक्रमांची होणार आहे. गुढीपाडव्याला सायंकाळी ७.३० वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली. संगीत महोत्सवाची सुरुवात १८ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता भिमण्णा जाधव व सहका-यांच्या मंगलध्वनी, सुंद्रीवादनाने होणार आहे.  सोहळ्याला विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनानंतर जितेंद्र भुरुक, रेवती मुखर्जी यांच्या ‘तुम आ गये हो’  हा कार्यक्रम होईल. गुढीपाडव्याला सकाळी ९ वाजता मंदिरामध्ये गुढीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यापूर्वी सकाळी ८ वाजता मंदिरामध्येच गणेशयाग होणार आहे. संगीत महोत्सवात सोमवारी (दि.१९) श्रीधर फडके यांचा फिटे अंधाराचे जाळे, मंगळवारी (दि.२०) धनश्री लेले, श्रीपाद ब्रह्मे यांचा पसायदान, लोककला ते आधुनिक संगीत एक प्रवास, बुधवारी (दि.२१) अशोक हांडे व सहका-यांच्या मंगलगाणी दंगलगाणी हा कार्यक्रम होणार आहे. तर, गुरुवारी (दि.२२) सुप्रसिद्ध गायिका आशा खाडिलकर यांचा स्वरोत्सव रसिकांना अनुभवता येणार आहे. शुक्रवारी (दि.२३) राहुल सोलापूरकर व जितेंद्र अभ्यंकर यांचा प्रभात ते सैराट चित्रप्रवास, शनिवारी (दि.२४) झी मराठी प्रस्तुत उत्सव नात्यांचा हा कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ गायक व संगीतकार पं.ह्रदयनाथ मंगेशकर व राधा मंगेशकर यांच्या भावसरगम या स्वरमैफलीने रविवारी (दि.२५) संगीत महोत्सवाची सांगता होणार आहे. संगीत महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. 

टॅग्स :Dagdusheth Templeदगडूशेठ मंदिरPuneपुणेmusicसंगीत