शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

खून करून मृतदेह पेटवला

By admin | Updated: July 6, 2017 02:52 IST

अज्ञात कारणावरून अज्ञात इसमाने तरुणाचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कराजगुरुनगर : अज्ञात कारणावरून अज्ञात इसमाने तरुणाचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले. योगेश बबन ठाकूर (वय ३२) रा. ठाकूर पिंपरी (ता. खेड) असे या घटनेत खून झालेल्या तरुणाचे असून जरेवाडी (ता. खेड ) येथे रस्त्याच्या कडेला त्यांचा मृतदेह मिळून आला.याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : मयत योगेश ठाकूर हा आईवडील,भाऊ, पत्नी यांच्यासह ठाकूर पिंपरी येथे एकत्र कुटुंबात राहत होता. घरची शेती व पुणे येथील खासगी फायनान्स कंपनीचे चार वर्षांपासून चाकण या भागाचे कामकाज पाहत होता. दि. ३ जुलै रोजी सकाळी ११वाजता मयत योगेश चाकणला कामाला गेला होता. संध्याकाळी घरी न आल्यामुळे व त्यांचा फोन बंद असल्यामुळे त्यांची शोधाशोध सुरू झाली होती. आज (४ जुलै ) सकाळी १० वाजता हरविल्याची तक्रार देण्यासाठी खेड पोलीस ठाण्यात कुटुंबातील सर्वजन आले होते. दरम्यान, गुळाणी-जरेवाडी या रोडच्या कडेला एका तरुणाचे प्रेत पडले आहे. असे पोलिसांनी सांगितल्यावर जाऊन पाहिले असता, हा योगेशचा मृतदेह असल्याची खात्री पटली. कोणीतरी अज्ञात कारणावरून जिवे मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून कमरेपासून वरचा भाग जाळून जरेवाडी रस्त्याच्या कडेला टाकण्यात आला आहे. याबाबत मयत योगशेचा आत्तेभाऊ संदीप बाळासाहेब दौंडकर यांनी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध फिर्याद दिली आहे. पुढील तपास खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधवकरत आहे.