शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती निवारणासाठी महापालिका सज्ज

By admin | Updated: July 5, 2016 03:24 IST

पालिकेतील विविध विभागांमधील तब्बल ११०० कर्मचाऱ्यांना आपत्ती निवारणाचे खास प्रशिक्षण देण्यात आले असून, जिल्हाधिकारी कार्यालयासह अन्य विभागांच्या अशाच कक्षांबरोबर

पुणे : पालिकेतील विविध विभागांमधील तब्बल ११०० कर्मचाऱ्यांना आपत्ती निवारणाचे खास प्रशिक्षण देण्यात आले असून, जिल्हाधिकारी कार्यालयासह अन्य विभागांच्या अशाच कक्षांबरोबर पालिकेचा कक्ष समन्वय ठेवून आहे. पावसाचे पाणी साचणाऱ्या शहरातील सुमारे ८० ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, तिथे आपत्ती निर्माण झाल्यास त्वरित मदत उपलब्ध करून दिली जाईल.अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी ही माहिती दिली. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने या वेळी उपस्थित होते. जून महिन्यातच या कक्षाच्या वतीने जाहीर प्रकटन करणे आवश्यक असताना त्याला विलंब झाला. याबाबत विचारले असता सोनुने यांनी कक्षाच्या आतापर्यंत दोन बैठका झाल्या आहेत, असे सांगून कक्षाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या पूरनियंत्रण आराखडा व आदर्श कार्यान्वित पद्धती या तब्बल ५० पृष्ठांच्या पुस्तिकेची माहिती दिली. या पुस्तकात विविध विभागांचे सरकारी अधिकारी, अग्निशमन दल, वीज कंपनी तसेच अन्य आवश्यक विभागांचे दूरध्वनी क्रमांक, पूरग्रस्तांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या शाळा अशी माहिती आहे.पावसाळ्यापूर्वी करण्याची नालेसफाई, प्रत्यक्ष पाऊस सुरू झाल्यावर घ्यायची आरोग्यविषयक काळजी, याबाबतची सर्व कामे महापालिकेने पूर्ण केली असल्याचे सोनुने यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मदतीसाठी दूरध्वनी क्रमांकआपत्तीकाळात नागरिकांनी २५५०६८००/१/२/३/४ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा. तिथे २४ तास अधिकारी उपलब्ध असून, त्वरित सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे सोनुने यांनी सांगितले.नागरिकांमध्ये जागृती व्हावी यासाठीही कक्षातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी पाणी शिरणाऱ्या वसाहतींमध्ये पुरापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी, प्रत्यक्ष पुरात सापडल्यानंतर काय करावे, काय टाळावे यासंबंधीच्या सूचना व मदत केंद्राचे दूरध्वनी क्रमांक आहेत, असे ते म्हणाले.