पुणो : महापालिकेच्या शाळांना सीसीटीव्ही कॅमेरे व बायोमेट्रिक मशिन्सची आवश्यकता आहे. उद्योग क्षेत्रकडून कॉर्पोरेट सोशल सिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत याची अपेक्षा व्यक्त करण्यात आले आहे. त्याबाबत शिक्षण मंडळाने संकेतस्थळावर याची माहिती दिली आहे.
शिक्षण मंडळाच्या वतीने नुकतेच शाळांसाठी आवश्यक भौतिक गरजांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार प्राथमिक शाळांना जवळपास सर्वच भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, माध्यमिकच्या 28 शाळांसाठी भौतिक सुविधांची कमतरता असल्याचे संकेतस्थळावर नमूद करण्यात आले असून, सीएसआरअंतर्गत त्यासाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व बायोमेट्रिक मशिन्सचा समावेश आहे.
संकेतस्थळ सुरु होण्यापूर्वी सीएसआरअंतर्गत आलेल्या प्रस्तावांवर काम सुरू आहे. अजून नवीन प्रस्ताव आलेले नाही. माध्यमिक शाळांमधील गळती रोखण्यासाठी मंडळाचे प्राधान्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार भौतिक गरजांची माहिती देण्यात आली आहे.- बबन दहिफळे
शिक्षणप्रमुख