शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचे पीएमपीएलला वर्षाला तब्बल ५० कोटी, फक्त पासमधील सवलत, दरवाढीच्या विरोधाची दखल नाही  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 03:41 IST

पासमधील सवलतीपोटी महापालिका पीएमपीएलला दरवर्षी तब्बल ५० कोटी रुपये अदा करीत असते, तरीही पीएमपीएलने ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी यांच्या पाससाठीच्या दरामध्ये मोठी वाढ केली, तसेच त्या वाढीला महापालिका पदाधिका-यांनी केलेल्या विरोधाची दखलही पीएमपीएल प्रशासनाने घेतलेली नाही.

पुणे : पासमधील सवलतीपोटी महापालिका पीएमपीएलला दरवर्षी तब्बल ५० कोटी रुपये अदा करीत असते, तरीही पीएमपीएलने ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी यांच्या पाससाठीच्या दरामध्ये मोठी वाढ केली, तसेच त्या वाढीला महापालिका पदाधिका-यांनी केलेल्या विरोधाची दखलही पीएमपीएल प्रशासनाने घेतलेली नाही. प्रशासनाच्या या मनमानीमुळे ज्येष्ठ नागरिक व पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.महापालिका पीएमपीएल प्रशासनाला संचलनातील तुटीपोटी दरवर्षी तब्बल १४४ कोटी रुपये देत असते. वर्षाच्या बरोबर सुरुवातीला पीएमपीएल प्रशासनाकडून ही मागणी केली जाते व त्याचा सातत्याने पाठपुरावा केला जातो. ही रक्कम वेगळीच, त्याशिवाय महापालिका पीएमपीएल प्रशासन विविध समाजघटकांना प्रवासी पासमध्ये सवलत देत असते. या सवलतीपोटी प्रशासनाला जी तूट येते तीतूटही महापालिकाच दरवर्षी ५० कोटी रुपये वेगळे देऊन भरून काढत असते. याही रकमेची मागणी पीएमपीएल प्रशासन बरोबर वर्ष संपले, की महापालिकेकडे करीत असते व त्याचा पाठपुरावाही करून पैसे पदरात पाडून घेत असते.असे असताना पीएमपीएल प्रशासनाने पासच्या दरांमध्येअचानक वाढ केली. ज्येष्ठ नागरिकांना ४५० रुपयांमध्ये मिळत असलेल्या पाससाठी आता ७५० रुपये द्यावे लागत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना६०० रुपये द्यावे लागत होते तिथेआता ७५० रुपये द्यावे लागतात. विद्यार्थ्यांचा अंतरानुसार असणारापास तर बंदच करण्यात आला आहे. त्यामुळे अंतर कमी असेल तर त्यांना रोजच्या रोज तिकीट काढावे लागण्याची कसरत करावी लागतेव ती टाळायची असेल तर मग७५० रुपयांचा आॅल रूट पासकाढावा लागतो.महापालिका पदाधिकाºयांनी या दरवाढीला तीव्र विरोध केला होता. महापालिकेच्या वतीने महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे पीएमपीएलच्या संचालक मंडळात आहेत. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वच नगरसेवकांनी पासच्या दरवाढीच्या निर्णयावर तीव्र टीका केली होती. तसेच नंतर पदाधिकाºयांनीही व्यवस्थापकीय संचालक तुकाराममुंढे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती, मात्र त्याचा काहीही उपयोग झालेला नाही असेच दिसते आहे.महापालिकेने पासपोटी देण्यात येत असलेल्या अनुदानात एक पैही कपात केलेली नाही, तरीही ही दरवाढ का करण्यात आली समजत नाही. ती मागे घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली, मात्र त्याकडे लक्ष दिलेले दिसत नाही. असे चालणार नाही. आम्ही मुंढे यांची पुन्हा भेट घेऊन त्यांच्याकडे याबाबत विचारणा करणार आहोत. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी जास्तीत जास्त सवलती द्याव्यात, असेच आमचे धोरण आहे.- मुरलीधर मोहोळ,अध्यक्ष, स्थायी समिती,महापालिकापीएमपीएलच्या व्यवस्थापनात अनेक चुकीच्या गोष्टी होत्या, त्या कमी करत आणल्या आहेत. पासमध्ये महापालिकेने अर्धे पैसे व पासधारकाने अर्धे पैसे देणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र हे प्रमाण ७० टक्के महापालिका ३० टक्के पासधारक असे होत होते. त्यात निम्मे पैसे पासधारक व निम्मे महापालिका असा बदल करण्यात आला व तो संयुक्तिक आहे.- सिद्धार्थ शिरोळे,संचालक-महापालिकापालिकेकडून पासचे पूर्ण पैसे मिळत असतानाही पीएमपीएल प्रशासनाला दर वाढवण्याचे कारण काय, असे ज्येष्ठ नागरिक संघटना व विद्यार्थ्यांच्या पालकांचे म्हणणे आहे. आता पासधारकांकडून जास्त पैसे घेत असताना पीएमपीएल पुढील वर्षांसाठी पालिकेकडून अनुदान जुन्या दराने घेणार की त्यात कपात करणार, अशीही विचारणा होत आहे.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे