शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव बुद्रुक येथे सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 11:44 IST

महापालिकेच्या बांधकाम विभागाने केली कारवाई ; बीडीपी क्षेत्रात सुरू होते बांधकाम 

धायरी: पुणे महानगरपालिका हद्दीमधील वडगाव बुद्रुक क्षेत्रातील सर्वे नंबर ४५ मध्ये जैव वैविधता उद्यान (बीडीपी) आरक्षण आहे. या बीडीपी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. आज महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या वतीने अनधिकृतपणे बांधण्यात येणाऱ्या दोन पाचमजली इमारतीवर कारवाई करण्यात आली आहे. 

 पुणे मनपा बांधकाम विभाग झोन क्रमांक दोनच्या पथकाने जॉ कटर मशीन, जेसीबी, २० बिगारी कर्मचारी, पोलीस कर्मचारी व स्थानिक पोलीस अधिकारी यांचे सहकार्याने ही कारवाई पार पाडली.  या अनधिकृत इमारतींचे एकूण १६००० चौ फूट आरसीसी पक्के बांधकाम पाडण्यात आले.कारवाई बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता युवराज देशमुख यांचे नियंत्रणाखाली झोन क्र. २ चे कार्यकारी अभियंता नामदेव गंभिरे, उपअभियंता राहुल साळुंखे, प्रताप धायगुडे, कैलास कराळे व सर्व कनिष्ठ अभियंते यांनी केली. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कणसे तसेच पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुसूचित प्रकार घडला नाही.  

कारवाई नावापुरतीच ; सर्व अनधिकृत बांधकामावर कारवाईची मागणी

टेकड्यांवरील जैव वैविधता टिकून राहण्यासाठी राज्य सरकारने डोंगरमाथा - उतार आणि टेकड्यांवर बांधकाम करण्यास बंदी घातली आहे. त्यानुसार महापालिकेने वडगांव बुद्रुक येथील काही भाग बीडीपी क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. येथील जागांची विक्री करता येत नसताना सुद्धा काही जागा मालकांनी जागा विक्री केल्या. त्यामुळे सदर परिसरात बांधकाम व्यावसायिकांनी अनधिकृतपणे बांधकामे सुरू केली आहेत. महापालिकेने एक - दोन इमारतींवर नावापुरती कारवाई न करता बीडीपी क्षेत्रातील सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी येथील नागरिक करीत आहेत.

टॅग्स :DhayariधायरीEnchroachmentअतिक्रमणPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका