शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

महापालिका देणार रेल्वेला साडेदहा कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2016 00:52 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत रावेत येथे पुणे-मुंबई लोहमार्गावर उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या उड्डाणपुलाचे संकल्पचित्र व आराखडा यास मंजुरी घेण्यासह पुलाचे काम सुरू करण्यासाठी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत रावेत येथे पुणे-मुंबई लोहमार्गावर उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या उड्डाणपुलाचे संकल्पचित्र व आराखडा यास मंजुरी घेण्यासह पुलाचे काम सुरू करण्यासाठी १० कोटी ४७ लाख रुपये मध्य रेल्वे विभागाला देण्यात येणार आहेत. मुकाई चौक ते भक्ती-शक्ती चौकापर्यंत महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यातील ४५ मीटर रुंद बीआरटीएस रस्ता विकसित करण्यात येणार आहे. या रस्त्याचे रावेत येथील निसर्गदर्शन सोसायटीजवळ पुणे-मुंबई लोहमार्गामुळे दोन भागांत विभाजन होत आहे. त्यामुळे या ठिकाणी लोहमार्गावर उड्डाणपूल बांधण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला. या कामासाठी निविदा खर्च ८७ कोटी ४५ लाख रुपये अपेक्षित धरण्यात आला आहे. यासह देखभाल शुल्कापोटीची उर्वरित रक्कम १० कोटी ४७ लाख दिल्यानंतरच रेल्वे उड्डाणपुलाचे संकल्पचित्र मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. तसेच काम करण्यापूर्वी करारनामा करण्यात येईल, असे ११ सप्टेंबर २०१५ रोजीच्या पत्राद्वारे मध्यरेल्वेने कळविले आहे. महापालिकेतर्फे ‘पी अ‍ॅन्ड ई चार्जेस’साठी आतापर्यंत ५७ लाख ६७ हजार रुपये मध्य रेल्वे विभागास दिले आहेत. त्यामुळे रेल्वे उड्डाणपुलाचे संकल्पचित्र व आराखड्याला मंजुरी मिळण्यासाठी व पुलाचे काम सुरू करण्यापूर्वी रेल्वेसमवेत करारनामा करणे आवश्यक आहे. त्यानुसार, मध्य रेल्वे विभागास देखभाल शुल्कासाठी द्यावयाच्या ११ कोटी ४ लाख ७८ हजार रकमेपैकी महापालिकेने दिलेले ५७ लाख ६७ हजार रुपये वजा करून उर्वरित १० कोटी ४७ लाख १० हजार ७५०रुपये रेल्वेला देण्यात येणार आहेत. या कामासाठी निविदा खर्च ८७ कोटी ४५ लाख रुपये अपेक्षित धरण्यात आला आहे. यासह देखभाल शुल्कापोटीची उर्वरित रक्कम १० कोटी ४७ लाख दिल्यानंतरच रेल्वे उड्डाणपुलाचे संकल्पचित्र मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. (प्रतिनिधी)रेल्वे प्रशासनाकडील नवीन निर्धारित नियमानुसार व भविष्यातील मुंबई-पुणे लोहमार्गाचे विस्तारीकरण करण्याची आवश्यकता या बाबींमुळे रेल्वेवरील उड्डाणपुलाची लांबी वाढत आहे. त्यामुळे या रेल्वे उड्डाणपुलाचे स्थापत्यविषयक सल्लागार यांनी फेरसादर केलेल्या अंदाजपत्रकीय रकमेनुसार देखभाल शुल्क देण्याबाबत मध्य रेल्वेने महापालिकेस पत्राद्वारे कळविले आहे.रेल्वे उड्डाणपुलाच्या या कामापोटी मध्य रेल्वे विभागास द्यावयाच्या एकूण रकमेपैकी ‘पी अ‍ॅन्ड ई चार्जेस’साठीची ३१ लाख १६ हजार इतकी रक्कम रेल्वे विभागास देण्याचा ठराव महापालिका स्थायी समितीने १७ जुन २०१४ रोजी मंजूर केला आहे. तसेच स्थायी समितीच्या ११ आॅगस्ट २०१५ रोजीच्या ठरावानुसार मध्य रेल्वे विभागास देखभालीसाठी एकत्रित द्यावयाच्या ११ कोटी ४ लाख रूपयांपैकी ‘पी अ‍ॅन्ड ई चार्जेस’मधील २६ लाख ५१ हजार रुपये वाढीव देण्यास मंजुरी घेण्यात आली आहे.