पुणे : शहराला ३० जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असल्याने पाणीकपातीमध्ये आणखी वाढ करता येणार नाही, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केले आहे. मात्र धरणातील पाणीसाठ्याची एकंदरीत परिस्थिती लक्षात घेऊन ८ जुलै रोजी शहरातील वाढीव पाणीकपातीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. शहराच्या पाणीकपातीचा निर्णय महापालिकेकडूनच घेतला जाईल, असे महापौर प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले.पाऊस पडेल, या अंदाजावर शहराचा पाणीपुरवठा अवलंबून ठेवता येणार नाही, ४० लाख लोकसंख्येच्या शहराचे पाण्याचे नियोजन करताना त्याचे भान ठेवावे लागेल. खरी वस्तुस्थिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितली जात नाही. पिंपरी-चिंचवड महापालिका त्यांच्या पाण्याचे नियोजन ३० आॅगस्टपर्यंत करते, त्याप्रमाणे पुणे महापालिकेचेही नियोजन झाले पाहिजे. ८ जुलै रोजी पाण्याची आढावा बैठक होणार आहे.
शहराच्या पाणीकपातीचा निर्णय महापालिका घेणार
By admin | Updated: July 3, 2016 04:18 IST