शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पालिका देणार नागरिकांना घरपोच टीडीआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 03:12 IST

कात्रज-कोंढवा रस्त्यावर प्रयोग; तीन महिन्यांत करणार प्रक्रिया पूर्ण

पुणे : महापालिका प्रशासनाने विकास प्रकल्पांची गती वाढविण्यासाठी तीन महिन्यांमध्ये हस्तांतर विकास हक्क (टीडीआर) प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असून, यापुढे नागरिकांना घरपोच टीडीआर हक्क देण्यात येणार आहेत. कात्रज-कोंढवा रस्तारुंदीकरणासाठी होणाऱ्या भूसंपादनामध्ये याची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी केली जाणार आहे.विकासकामांसाठी कराव्या लागणाºया भूसंपादनादरम्यान बाधितांना एसएसआय (चटई क्षेत्र) आणि टीडीआर, रोख मोबदला दिला जातो; मात्र गेल्या काही दिवसांत नागरिकांकडून रोख मोबदल्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाला आर्थिक तरतूद करणे अवघड जात आहे. नागरिकांनाही टीडीआर मिळण्यासाठी कागदपत्रांच्या पूर्ततेसोबतच शासकीय मोजणी करून पालिकेला प्रस्ताव द्यावा लागतो. हा प्रस्ताव पालिकेच्या विविध विभागांमधून फिरत जातो. टीडीआर मिळेपर्यंत नागरिकांना मनस्तापाचाही सामना करावा लागतो. यामध्ये जवळपास दीड वर्षाचा कालावधी जातो. त्यामुळे नागरिक वैतागून जातात. महापालिका आयुक्तांनी नुकताच कात्रज-कोंढवा रस्ता आणि शिवणे-खराडी नदीपात्रातील रस्त्यासाठी विशेष कक्ष स्थापन केला आहे. या कामांना गती देण्यासाठी तसेच जमीनमालकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळण्यासाठी बाधितांना घरपोच टीडीआर प्रमाणपत्र देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या कामासाठी एक अधिकारी आणि त्यांच्या पथकाची नेमणूक करण्यात येणार असून, त्यांच्या भूसंपादनाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त (विशेष) राजेंद्र निंबाळकर यांनी सांगितले. जागामालकांशी संवाद आणि संपर्क साधणे, बाधित मिळकतींची मोजणी करणे, रेखांकन, प्रशासकीय शुल्क भरणे, हमीपत्र, शपथपत्र, बंधपत्र करणे आदी कामांचा समावेश असणार आहे.कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात येत असून, अद्याप २५० मिळकतींचे भूसंपादन बाकी आहे. कोट्यवधींचा रोख मोबदला देण्यासाठी आवश्यक तरतूद नसल्याने प्रशासनाने घरपोच टीडीआर देण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिका