शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत संख्याबळ जास्त; मात्र पदे देताना महिलांची अवहेलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 02:18 IST

लाभाच्या पदांवर पुरुषांची मक्तेदारी : आता समित्यांमध्ये ५० टक्के आरक्षणाची गरज

- सुषमा नहेरकर-शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपामध्ये एकूण ९८ नगरसेवकांमध्ये महिला नगरसेवकांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक असून देखील, पदे देताना मात्र महिलांची अवहेलना होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ आरक्षणामुळे महापौर पद व महिला व बालकल्याण समितीचे अध्यक्षपद महिलांना मिळाले आहे. परंतु, स्थायी समिती, सभागृहनेते पद, उपमहापौर, शहर सुधारण या सारखी लाभाची पदे देताना महिलांना डावले जात आहे. यामुळे आता शासनाने समित्यांमध्ये देखील महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा, त्यांना पुरुषांच्या बरोबरीने प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी यासाठी शासनाने महिलांना थेट ५० टक्के आरक्षण दिले. यामुळे गेल्या दहा वर्षांत महापालिकेच्या सभागृहामध्ये महिलांचा टक्का वाढला आहे. दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या निवडणुकीत सत्तातर होऊन भारतीय जनता पार्टी प्रचंड बहुमताने सत्तेवर आली. महापालिकेच्या एकूण १६२ नगरसेवकांपैकी एकट्या भाजपाचे ९८ नगरसेवक निवडून आले. या ९८ नगरसेवकांमध्ये तब्बल ५२ नगरसेवक महिला असून, पुरुष नगरसेवक ४६ एवढे आहेत.

सध्या महापालिकेत शासनाच्या पातळीवर केवळ महापौर पदासाठी आरक्षण जाहीर केले जाते. पुण्याचे महापौर पद महिलांसाठी आरक्षित असल्याने या पदावर मुक्ता टिळक यांची निवड करण्यात आली. परंतु, पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक असतानादेखील इतर समित्यांचे अध्यक्षपद देताना महिलांचा विचार होताना दिसत नाही. सध्या महिला व बालकल्याण समिती आणि विधी समितीचे अध्यक्षपद महिलांकडे आहे. परंतु, स्थायी समिती असो की शहर सुधारणा समिती, क्रीडा समिती, नाव समिती, सभागृह नेतेपद या प्रमुख पदांवर महिलांना मात्र आजही डावले जात आहे. त्यामुळे संख्याबळाचा विचार करता पदांचे वाटप करताना देखील महिलांना ५० टक्के समसमान संधी देण्याची मागणी दबक्या आवाजात महिला करू लागल्या आहेत.स्थायी समितीत दहापैकी केवळ दोन महिला1 महापालिकेत सर्वांत महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीमध्ये देखील भाजपाकडून महिलांना डावलण्यात आले आहे. स्थायी समितीच्या एकूण १६ सदस्यांपैकी १० सदस्य भाजपाचे आहेत.2यामध्ये दहा सदस्यांमध्ये भाजपाकडून केवळ दोन महिलांनाच प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. स्थायी समितीचे अध्यक्षपद तर नाहीच किमान सदस्य देताना तरी महिलांना ५० टक्के प्रतिनिधित्व मिळण्याची अपेक्षा काही महिलांनी व्यक्त केली.आज स्थायी समिती अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल होणारस्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी गुरुवार (दि.२८) रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. यामध्ये प्रामुख्याने भाजपाकडून अध्यक्षपदासाठी सुनील कांबळे, हेमंत रासणे आणि उमेश गायकवाड यांच्या नावांची चर्चा असून, अर्ज भरल्यानंतर नक्की उमेदवार कोण हे आज स्पष्ट होईल.