शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात नदीपात्रालगतच्या मंगल कार्यालयांवर महापालिकेची कारवाई, अनाधिकृत शेड काढले

By राजू हिंगे | Updated: December 8, 2023 13:55 IST

या कारवाईपूर्वीच काही मंगल कार्यालयांनी लग्न सोहळा असताना देखील अनाधिकृत शेड काढण्यास स्वतः सुरुवात केली आहे...

पुणे : म्हात्रे पूल ते राजाराम पूल यादरम्यानच्या नदी पात्रालगतच्या मंगल कार्यालयांंवर पुणे महापालिकेच्या बाधंकाम आणि अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई  करण्यात आली. या कारवाईपूर्वीच काही मंगल कार्यालयांनी लग्न सोहळा असताना देखील अनाधिकृत शेड काढण्यास स्वतः सुरुवात केली आहे.

म्हात्रे पूल ते राजाराम पूल नदी काठच्या भागात मंगल कार्यालये, लॉन्स, हॉटेल आदी व्यवसाय सुरु झाले आहेत. त्या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी. बांधकाम नियमावलीत बदल करण्यासाठी नगर विकास विभागाकडे प्रस्ताव पाठवला असला तरी त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे महापालिकेकडे मिळकतकर भरूनही जागा मालकांवर कारवाईची टांगती तलवार आहे.

म्हात्रे पूल ते राजाराम पूल या दरम्यानच्या बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. त्यानुसार पुणे महापालिकेने डिपी रस्त्यावरील मंगल कार्यालयावर पालिकेने कारवाई सुरू केली.या कारवाईपुर्वीच काही मंगल कार्यालयांनी लग्न सोहळा असताना देखील अनाधिकृत शेड काढण्यास स्वतः सुरवात केली आहे असे पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी बिपिन शिंदे यांनी सांगितले. ५०० पेक्षा जास्त विवाह सोहळे होणार होते...

डीपी रस्त्यावर अनेक मंगल कार्यालये आहेत. विवाह सोहळ्यांसाठी नागरिकांनी पैसे भरून बुकींग केलेले आहे. डीपी रस्त्यावर पुणे महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक कारवाईसाठी गेले. त्यावेळी एका मंगल कार्यालयात विवाह सोहळा होता. पण पालिका कारवाई करणार यामुळे संबंधित कार्यालयाने स्वतःहून अनाधिकृत शेड काढण्यास सुरवात केली. या कारवाईमुळे अनेकांचे विवाह अवघ्या एक दोन आठवड्यांवर आलेले आहेत असे असताना महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे जागा मालक आणि लग्न सोहळ्यासाठी बुकिंग केलेल्या नागरिकांचे धाबे दणाणले आहेत.

टॅग्स :PuneपुणेMuncipal Corporationनगर पालिकाEnchroachmentअतिक्रमण