पुणे : शहरातील कचरा शहरातच जिरविण्यासाठी पालिकेकडून सर्वंकष कचरा व्यवस्थापन आराखड्याची ब्लू प्रिंट तयार करण्यात येणार आहे. या आराखड्यात पुढील नऊ महिन्यांत शहरातील कचरा शहरातच जिरविण्यासाठी प्रत्येक महिन्याचा स्वतंत्र कालबद्ध कार्यक्रम असणार आहे. हा आराखडा पुढील दोन दिवसात्ां अंतिम करण्यात येणार असून, त्याचे सादरीकरण उरुळी देवाची व फुरसुंगी येथील ग्रामस्थांपुढे सादर करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक प्रभागनिहाय माहिती क्षेत्रीय कार्यालयांकडून संकलित करण्यात येत आहे. उरुळी देवाची येथील कचरा डेपो बंद करण्याच्या मागणीसाठी दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी कचरा बंद आंदोलन पुकारले होते. हे आंदोलन मागे घेण्यास ग्रामस्थ तयार नसल्याने स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टाई करून हे आंदोलन मागे घेऊन महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले होते. त्यानुसार, आंदोलन मागे घेत ग्रामस्थांनी महापालिकेस नऊ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, असे असले तरी आता महापालिकेनेच डेपोवर कचरा टाकू न देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे पुढील नऊ महिन्यांत शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यातील ८० टक्के कचरा शहरातच जिरविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखला जाणार असून, त्यासाठी कचऱ्याÞच्या सद्यस्थितीविषयी माहिती संकलनाचे काम सुरू आहे. (प्रतिनिधी)
कचरा व्यवस्थापनासाठी पालिकेची ब्लू प्रिंट
By admin | Updated: January 14, 2015 03:16 IST