शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पालिका प्रशासनाकडूनच कोटींच्या कोटी वर्गीकरणे, सदस्यांनी घेतला समाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 02:32 IST

महापालिकेच्या कामकाजात आर्थिक शिस्त आणण्यासाठी नगरसेवकांनी प्रशासनाच्या मान्यतेशिवाय परस्पर ठरावाद्वारे वर्गीकरण करू नये, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

पुणे : महापालिकेच्या कामकाजात आर्थिक शिस्त आणण्यासाठी नगरसेवकांनी प्रशासनाच्या मान्यतेशिवाय परस्पर ठरावाद्वारे वर्गीकरण करू नये, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. परंतु आर्थिक शिस्तीचे धडे देणाऱ्या प्रशासनकडूनच कोटींच्या कोटी वर्गीकरण करून घेतली. सभासदांनीदेखील संधीचा फायदा घेत प्रशासनाचा मुख्य सभेत चांगलाच समाचार घेतला. परंतु अखेर अळी मिळी गुप चिळी करत प्रशासनास, सत्ताधारी, विरोधकांचे तब्बल ५० ते ५५ कोटी रुपयांचे वर्गीकरणाचे प्रस्ताव सोमवारी झालेल्या मुख्य सभेत मंजूर करण्यात आले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी झालेल्या मुख्य सभेत मोठ्या प्रमाणात वर्गीकरणाचे प्रस्ताव ठेवण्यात आले होते. सत्ताधाºयांसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घुसडलेले प्रस्ताव बिनबोभाट मंजूर करण्यात आले.औषध खरेदीसाठी प्रशासनाला वर्गीकरणाद्वारे चार कोटी रुपयांच्या निधीचे वर्गीकरण करण्यात आले. मोठ्या योजनांचा निधी किरकोळ कामांसाठी वर्गीकरण करता येणार नाही, असे आयुक्त सौरभ राव यांनीच स्पष्ट केले असताना सोमवारी नदीसुधार योजनेचा निधी अत्यंत फुटकळ कामांसाठी वर्गीकरणाद्वारे वळविण्यात आला. प्रशासनाकडून वर्गीकरणाचा प्रस्ताव आल्यानंतर सदस्यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. मात्र कामे करावीच लागणार असल्याचे सांगत वर्गीकरणाचे सर्व ठराव मंजूरदेखील केले.महापालिकेच्या सन २०१८-१९ च्या अंदाजपत्रकांची मुदत संपण्यासाठ दोन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे योजनांसाठी प्रस्तावित निधी वाया जाऊ नये, म्हणून मोठ्या प्रमाणात निधीचे प्रभागातील किरकोळ कामांसाठी वर्गीकरण करण्यात येत आहे.गेल्या काही महिन्यात सदस्यांकडून तब्बल दीडशे ते दोनशे कोटी रुपयांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. शहरामध्ये पाणीटंचाई असल्याचे सांगत टँकर पुरविण्यासाठी दीड ते दोन कोटी रुपयांचेवर्गीकरण करण्यात आले.याशिवाय शहरात रस्तेदुरुस्ती, सांडपाणी वाहिन्या टाकणे, नाल्यातील गाळ काढणे, दिशादर्शक फुलक, सुशोभीकरण करणे, कालव्याला जाळ््या बसविणे अशा कामांसाठी सदस्यांकडून कोट्यवधी रुपयांच्या निधीचे वर्गीकरणकरण्यात आले.