शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे मार्ग : ‘हायपरलूप वन’कडून पाहणी; पदाधिकाऱ्यांकडून हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 02:36 IST

पुणे-मुंबई दरम्यान हायपरलूप या नवीन प्रकारच्या वाहतुकीचा वापर करण्याबाबतच्या हालचालींना वेग आला असून मंगळवारी ‘हायपरलूप वन’या कंपनीच्या पदाधिकाºयांनी प्रस्तावित मार्गाची पहाणी केली.त्याचप्रमाणे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा केली.

पुणे : पुणे-मुंबई दरम्यान हायपरलूप या नवीन प्रकारच्या वाहतुकीचा वापर करण्याबाबतच्या हालचालींना वेग आला असून मंगळवारी ‘हायपरलूप वन’या कंपनीच्या पदाधिकाºयांनी प्रस्तावित मार्गाची पहाणी केली.त्याचप्रमाणे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा केली.कंपनीकडून पुढील सहा महिन्यात या संदर्भातील व्यवहार्यता अभ्यास अहवाल पीएमआरडीएमार्फत शासनास सादर केला जाणार आहे.महाराष्टÑ शासन आणि लॉस एंजेलिसमधील ‘हायपरलूप’ यांच्यात नोव्हेंबर २०१७ मध्ये पुणे - मुंबई हायपरलूप संदर्भात सामंजस्य करार झाला आहे. हायरपरलूप कंपनीकडून पुणे-मुंबई मार्गाचा पूर्व व्यवहार्यता अभ्यास अहवाल पीएमआरडीएला सादर करण्यात आला. आता अतिजलद वाहतुकीची सुविधा देणाºया या प्रकल्पाचा व्यवहार्यता अभ्यास अहवाल तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. पीएमआरडीए आणि हायपरलूप कंपनीकडून संयुक्तपणे हा अहवाल केला जात आहे.त्याचा सर्व खर्च हायपरलूपकडून करणार आहे. मुंबई आणि पुणे विभागांतील महानगर प्रदेशांना हायपरलूप तंत्रज्ञानाने जोडल्यास २० मिनिटांपेक्षा कमी वेळेत प्रवास करणे शक्य होणार आहे.मात्र,त्याची व्यवहार्यता तपासून मगच हा प्रकल्प करण्यात येणार आहे.- हायपरलूपसाठी आवश्यक परवानग्या,त्यासाठी लागणारी जमीन,अभियांत्रिकी आव्हाने याबाबतची पाहणी ‘हायपरलूप वन’च्या पदाधिका-यांकडून सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून कंपनीचे पदाधिकारी मुंबईत आहेत. मंगळवारी कंपनीच्या पदाधिकाºयांनी प्रस्तावित मार्गाची पहाणी केली.पुढील सहा महिन्यात त्यांच्याकडून यावरील व्यवहार्यता अभ्यास अहवाल प्राप्त होईल. हा अहवाल राज्य शासनाला सादर केला जाईल.शासनाकडून मंजुरी प्राप्त झाल्यानंतर या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यात येईल, असे किरण गित्ते यांनी सांगितले.

टॅग्स :Hyperloopहायपर लूप