पुणे, दि. 14 - लोणावळा आणि मंकी हिल दरम्यान देखभाल दुरुस्तीसाठी ब्लॉक घेतल्याने गुरुवारी व शुक्रवारी या दोन दिवस सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस, पुणे -कर्जत पॅसेंजर रद्द करण्यात आल्या आहेत़
गेल्या आठवड्यात ७ सप्टेंबरला मंकी हिल ते खंडाळा दरम्यान मालगाडी घसरल्याने जवळपास २ दिवस रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती़ यावेळी रेल्वे मार्गाचे अनेक स्लिपरची मोडतोड झाली होती़ काही खांबही पडले होते़ त्यामुळे मुंबई -पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती़ रेल्वेने तातडीने तात्पुरती दुरुस्ती हाती घेऊन रेल्वे मार्ग सुरु केला होता़ गेले आठवडाभर या ठिकाणाहून गाड्या जाताना त्या अतिशय हळू जात होत्या़ अपघात झालेल्या ठिकाणचे रेल्वेमार्गाखालील स्लिपर बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे़ त्यासाठी १४ व १५ सप्टेंबर रोजी देखभाल दुरुस्तीसाठी रेल्वेने ब्लॉक घेतला आहे़ त्यामुळे गुरुवारी मुंबईहून सुटणारी डेक्कन एक्सप्रेस व सिंहगड एक्सप्रेस रद्द केली आहे़ तसेच पुणे -कर्जत -पुणे ही पॅसेजर दोन दिवस रद्द केली आहे़
शुक्रवारी सकाळी पुण्याहून सुटणारी सिंहगड एक्सप्रेस रद्द केली आहे़तसेच भुसावळ -पुणे -भुसावळ एक्सप्रेस ही गाडी दौंड, मनमाडमार्गे वळविण्यात आली आहे़
याचबरोबर पुणे व दौंड दरम्यान रेल्वेमार्गाच्या देखभालीसाठी १६ ते ३० सप्टेंबर दरम्यान दररोज दुपारी तीन तास ब्लॉक घेतला जाणार आहे़ त्यामुळे पुणे -दौंड दरम्यान धावणाºया दुपारच्या गाड्यांवर त्याचा परिणाम होणार आहे़ दुपारची पुणे -दौंड -पुणे डेमू रद्द करण्यात आली आहे़
अचानक रेल्वे रद्द केल्याने प्रवाशांचे हाल
पुण्याहून मुंबईला दुपारी जाणारी डेक्कन एक्सप्रेस गुरुवारी सकाळी रद्द करण्याची घोषणा मुंबईहून करण्यात आली़ त्याची पुणे रेल्वे प्रशासनाला अगोदार काहीच कल्पना नव्हती़ मुंबईहून पुण्याला येणारी डेक्कन एक्सप्रेसही रद्द करण्यात आली होती़ सकाळच्या गाड्यांनंतर मुंबईला जाण्यासाठी डेक्कन एक्सप्रेसचा पर्याय असंख्य प्रवासी निवडतात़ त्यामुळे ही गाडी नेहमीच रिझर्व्ह असते़ अनेक दिवस अगोदर तिकीट आरक्षित करतात़ त्याचबरोबर या गाडीला अनारक्षित डबे अधिक असल्याने ऐनवेळी प्रवास करणाºयांची संख्या अधिक असते़ अनेकांनी निघायची तयारी सुरु केली असताना त्यांना गाडी रद्द करण्यात आल्याचा एसएमएस दुपारी १२च्या सुमारास आला़ तर काही जणांनी एसएमएस न पाहिल्याने ते थेट पुणे रेल्वे स्टेशनवर आले़ ज्यांना जावे आवश्यक होते, त्यांना त्याचवेळी जाणाºया पुणे -इंदौर गाडीने जावे लागले़ काहींनी प्रवास रद्द करण्याचा निर्णय घेतला़