शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नर तहसीलसमोर शेतकऱ्यांचे मुंडण आंदोलन

By admin | Updated: April 9, 2017 04:21 IST

शेतकरीवर्गाच्या कर्जमुक्तीसाठी व डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी शिवनेरी शेतकरी संघटनेच्या वतीने जुन्नर तहसील कार्यालयासमोर

जुन्नर : शेतकरीवर्गाच्या कर्जमुक्तीसाठी व डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी शिवनेरी शेतकरी संघटनेच्या वतीने जुन्नर तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी मुंडण आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. तर किसान क्रांती मोर्चाच्या वतीने शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला. शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष राजेंद्र ढोमसे, जिल्हाध्यक्ष रमेश शिंदे, तालुकाध्यक्ष योगेश तोडकर, लक्ष्मण शिंदे यावेळी उपस्थित होते.शेतमालाला हमीभाव नसल्याने उत्पादन खर्चदेखील वसूल होत नाही. या परिस्थितीत शेतकऱ्याने काय करायचे, शेतकरी कुटुंबाची मानसिक अवस्था खराब होत आहे. दैनंदिन खर्च भागविणे कठीण झाले असून कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. राज्य शासन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी गंभीर नाही. शासन शेतकरी वगार्साठी काम करत नसून केवळ शहरी भागातील मध्यमवर्गीयांसाठी सत्ता राबविली जात आहे. अन्नदाता शेतकरी देशोधडीला लावण्याचे शासनाचे धोरण आहे, अशी टीका आंदोलकांनी यावेळी केली.शेतीमालाला हमीभाव मिळावा, शेतीपंपाचे विजबील माफ करावे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती व्हावी, डॉ. स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी व्हावी, शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प असावा. ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन योजना सुरू करावी, आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार आशा होळकर यांना यावेळी देण्यात आले. तसेच किसान क्रांती शेतकरी बांधव संघटनेच्या वतीने जुन्नर तहसील कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला. (वार्ताहर)

- शेतकऱ्यांच्या व विविध मागण्यांसाठी करण्यात आलेल्या आंदोलनास तसेच मोर्चास शेतकरीवर्गाची मात्र तुरळक उपस्थिती दिसून आली. शिवनेरी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात येणारे निवेदन स्वीकारण्यासाठी स्वत: तहसीलदारांनी आंदोलनस्थळी यावे, अशी मागणी करीत संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र ढोमसे यांनी यावेळी रूद्रावतार धारण केला.रात्रंदिवस कष्ट करणारा शेतकरी येथे कडक उन्हात आंदोलन करत असताना शासनाच्या प्रतिनिधी असलेल्या तहसीलदार यांना आंदोलकांची कदर नाही, अशी टीका त्यांनी केली.मंडल अधिकारी आंदोलनस्थळी निवेदन स्वीकारण्यास आले. परंतु संघटनेने नकार दिला. पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांच्या मध्यस्तीनंतर तहसीलदारांनी निवेदन दिले.