शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईने ज्ञानोबा माऊलींसाठी धाडिला रक्षेचा धागा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 02:50 IST

जळगाव व पंढरपूर येथील संत मुक्ताई संस्थानच्या माध्यमातून नारळी पौर्णिमा अर्थात ‘रक्षाबंधन’ सणाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताई संस्थानाकडून यंदा प्रथमच बंधू संत ज्ञानदेवांसाठी राखी अर्पण करण्यात आली.

 आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानोबाराय आणि त्यांची बहीण लाडकी मुक्ताई यांच्यातील प्रेम पुन्हा एकदा नव्याने जगासमोर जागवण्याचा एका विधायक उपक्रम नुकताच आळंदीत राबवला गेला. जळगाव व पंढरपूर येथील संत मुक्ताई संस्थानच्या माध्यमातून नारळी पौर्णिमा अर्थात ‘रक्षाबंधन’ सणाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताई संस्थानाकडून यंदा प्रथमच बंधू संत ज्ञानदेवांसाठी राखी अर्पण करण्यात आली.रक्षाबंधन हा भावबहिणीतील नाते अधिक दृढ करण्याचा सण.हिंदू संस्कृतीत या सणाला एकवेगळे महत्त्व आहे. निवृत्तीमहाराज, सोपान, ज्ञानेश्वर आणि मुक्ताई या चार बंधुचे नातेही असेचआदर्शवत होते. संत साहित्यामध्ये तर चारही भावांची ही नावे नुसती नावे नसून ते जीवनोद्धाराचे व मोक्षाचे मार्ग मानले जातात.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि मुक्ताई यांच्यातील नाते हे अतिशय सुंदर असेच होते. मुक्ताईचे संत ज्ञानेश्वरांशी असणारे बहिण भावाचे नाते आजच्या जगातही अत्यंत प्रेरक आणि आदर्शवत आहे. तोच संस्कार जपण्याच्या दृष्टिकोनातून हा अभिनव असा उपक्रम आळंदीमध्ये पहिल्यांदाच हा उपक्रम आज राबविण्यात आला. मुक्ताई संस्थानच्या पुढाकाराने तो पूर्णत्वास गेला.मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांचे चिरंजीव संदीपपाटील यांना हा उपक्रम सुचला.संत ज्ञानेश्वरमहाराज संस्थानचेप्रमुख विश्वस्त अभय टिळकयांनी हा ‘पवित्र धागा’ माऊलींच्या संजीवन समाधीवर ठेवून जयजयकार केला.संत मुक्ताई संस्थानकडून यावर्षीपासून सुरू करण्यात आलेल्या उपक्रमामार्फत त्रंबकेश्वर येथील निवृत्तीनाथमहाराज, आळंदीतील ज्ञानेश्वरमहाराज, सासवड येथील सोपानकाका यांनाही राखी पाठविण्यात आली आहे.चालू वर्षीपासून मुक्ताई संस्थानने सुरूकेलेला हा उपक्रम खरोखर गोड आहे. आम्ही या उपक्रमाचे कौतुक करतो. रक्षाबंधनाच्या दिवशी मुक्ताईचा हा पवित्र धागा साºया विश्वाला बंधुप्रेमाचा धडा देईल.- अभय टिळक, प्रमुख विश्वस्त आळंदीमुक्ताई संस्थानाकडून तिन्ही भावंडांना राखी जावी असा माझा मानस होता. त्यामुळे तो तत्काळ अमलात आणण्यासाठी प्रथम संत माऊलींना राखी अर्पण करण्यात आली.- संदीप पाटील