शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मैफल सर्वार्थाने आनंदाची उधळण करेल - पं. विश्वमोहन भट्ट  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 01:58 IST

दिवाळीच्या निमित्ताने होत असलेली संगीताची आराधना आणि त्यामध्ये सादर होणार असलेले प्रात:समयीचे राग हा दुग्धशर्करा योगच आहे. सकाळचे राग सुमधुर असतात.

पुणे - दिवाळीच्या निमित्ताने होत असलेली संगीताची आराधना आणि त्यामध्ये सादर होणार असलेले प्रात:समयीचे राग हा दुग्धशर्करा योगच आहे. सकाळचे राग सुमधुर असतात. त्यामध्ये मृदू स्वरांचा प्रयोग होतो. रागांमधून सूर्योदयाचा नयनमनोहारी आभास होतो. बहुतांश वेळा संगीत मैफली सायंकाळी होत असल्याने रसिकांसाठी सकाळचे राग दुर्मिळ झाले आहेत. त्यामुळेच पाडव्याच्या शुभमुहूर्तावर होत असलेली मैफल ही सर्वार्थाने संस्मरणीय आणि आनंदाची उधळण करणारी असेल, अशा शब्दांत ग्रॅमी पुरस्कार विजेते प्रख्यात वादक पं. विश्वमोहन भट्ट यांनी प्रात:मैफलीबाबत आनंद व्यक्त केला.युवराज ढमाले कॉर्प प्रस्तुत ‘लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’ फिनोलेक्स पाईप्स व पीएनजी ज्वेलर्स यांच्या सहयोगाने दिवाळी पाडव्याच्या ‘लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ग्रॅमी पुरस्कार विजेते पं. विश्वमोहन भट्ट यांच्या मोहनवीणेचे सुमधुर सूर रसिकांच्या दिवाळी पहाटचा आनंद द्विगुणित करणार आहेत. ‘लोकमत’तर्फे आयोजित ‘दिवाळी पहाट’ ही कलाकार आणि रसिकांसाठी सुरेल पर्वणी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.ते म्हणाले, ‘‘सकाळचे राग खूप कमी वेळा ऐकायला मिळतात. या मैफलीच्या माध्यमातून रसिकांच्या अहिरभैरवसारखे दुर्मिळ राग कानी पडतील. सध्याचा जमाना करमणुकीच्या अनेक पर्यायांचा आहे. यूट्यूबसारख्या पर्यायामुळे शास्त्रीय संगीत मैफली सहजपणे अनुभवायला मिळतात. अशा काळातही पुण्यासारख्या शहरांमध्येही संगीत मैफलींना श्रोते आवर्जून हजेरी लावतात, हे विशेष. यामुळे कलाकारांचाही गौरव होतो आणि त्यांना प्रोत्साहनही मिळते. उत्साही आणि दर्दी रसिकांमुळे मैफलींचा कळसाध्याय गाठला जातो.’’‘‘तरुण पिढीसमोरील मनोरंजनाचे पर्याय बदलले आहेत, असे म्हटले जाते. मात्र, भारतात विविध संस्था शास्त्रीय संगीताबाबत तरुणाईमध्ये जागरूकता निर्माण करत आहेत. सध्याची पिढी अतिशय हुशार आणि संगीतावर मनापासून प्रेम करणारी आहे. शास्त्रीय संगीत हे भारतीय परंपरेचे मूळ आहे. त्यामुळे हे मूळ तरुणाई कधीच विसरणार नाही. तरुणाईमधून श्रोत्यांप्रमाणेच उमदे कलाकारही तयार होत आहेत. प्रत्येक कलाकारासाठी रियाझ अत्यंत महत्त्वाचा असतो. रियाझातून सादरीकरणामध्ये शुद्धता येते, गळा तयार होतो, लय आणि सुरांवरील पकड पक्की होते. कलाकार मैफलीत आत्ममग्न झाला, की रसिकांपर्यंतही हा आनंद पोहोचतो,’’ असेही भट्ट म्हणाले.सहयोगी प्रायोजक काका हलवाई स्वीट सेंटर, लोकमान्य मल्टिपर्पज को-आॅप. सोसायटी, खत्री बंधू पॉट आईस्क्रिम व मस्तानी, लक्ष्मीनारायण चिवडा, राणी पुतळाबाई वुमन्स लॉ कॉलेज हे आहेत. बेव्हरेज पार्टनर ऊर्जा, रेडिओ पार्टनर रेडिओ सिटी, हॉस्पिटॅलिटी पार्टनर जेडब्ल्यू मॅरिएटहे आहेत.कार्यक्रम स्थळ :महालक्ष्मी लॉन्सराजाराम पुलाजवळ, एरंडवणे, पुणेदिनांक : गुरुवार, ८ नोव्हेंबरवेळ : पहाटे ५.३० वाजताप्रवेश सर्वांसाठी विनामूल्य खुला प्रवेशिका आवश्यक

टॅग्स :PuneपुणेDiwaliदिवाळी