शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विजेते झिजवताहेत एमटीडीसीचे उंबरठे

By admin | Updated: April 19, 2016 00:50 IST

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) घेण्यात आलेल्या लघुपट स्पर्धेत कलाकारांच्या कलाकृतीवर पारितोषिकांची मोहोर उमटली खरी

नम्रता फडणीस, पुणेपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) घेण्यात आलेल्या लघुपट स्पर्धेत कलाकारांच्या कलाकृतीवर पारितोषिकांची मोहोर उमटली खरी; परंतु तीन महिने उलटून गेले, तरी पारितोषिकांची रक्कमच विजेत्यांच्या हाती पडली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विजेत्यांवर एमटीडीसीचे उंबरे झिजविण्याची वेळ आली आहे. एखाद्या स्पर्धेत पुरस्कार मिळाल्याचा आनंद काही निराळाच असतो. त्यातही जर पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक आणि तेही घसघशीत रकमेचे असेल, तर मग विचारायलाच नको. विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी पारितोषिक हुरूप देणारे असते. अशीच काहीशी आनंदानुभूती स्पर्धेत सहभागी झालेल्यांनी आली. पारितोषिक जाहीर झाल्यानंतर त्यांच्यासाठी जणू आकाशच ठेंगणे झाले होते. दर वर्षी जानेवारी महिन्यात होणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) एमटीडीसीतर्फे लघुपट स्पर्धा घेतली जाते. यंदाच्या वर्षी ‘औरंगाबाद अ‍ॅज अ टुरिस्ट डेस्टिनेशन’, ‘वाईल्ड लाईफ आॅफ विदर्भ (ताडोबा) आणि ‘कोकण- बीचेस अ‍ॅँड स्कूबा डायव्हिंग’ अशा तीन विभागांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. या तिन्ही विभागांमधून पिफच्या समारोपामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली. यामध्ये पारितोषिकाची रक्कम ही अनुक्रमे १ लाख २५ हजार रुपये व ७५ हजार रुपये, अशी होती. पारितोषिकाच्या रकमेतील विलंबासंदर्भात एमटीडीसीकडून मिळालेल्या माहितीनुसार ,शासनाकडून निधीच उपलब्ध झालेला नाही. नुकतीच आॅर्डर निघाली आहे. मात्र, पैसे जमा झाल्यानंतरच धनादेश काढण्यात येईल, असे सांगण्यात आले.