शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

MPSC : २०२० पासून रखडलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या भरतीचा मार्ग मोकळा

By नम्रता फडणीस | Updated: October 6, 2022 15:15 IST

उमेदवारांची यादी जाहीर करुन त्यांना नियुक्ती देण्यात येणार...

पुणे : सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या (RTO) २०२० पासून रखडलेल्या भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयापुढे झालेल्या सुनावणीनंतर न्या. आर डी धनुका व न्या. कमल खता यांच्या खंडपीठाने विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल दिला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर करुन त्यांना नियुक्ती देण्यात येईल, असे अ‍ॅड. तृणाल टोणपे यांनी सांगितले.

जानेवारी २०२० मध्ये एमपीएससीव्दारे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदासाठी २४० जागांची जाहिरात काढण्यात आली होती. त्यानंतर १५ मार्च २०२० रोजी पूर्व परीक्षा आणि २४ ऑगस्ट २०२१ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. २२ मार्च २०२२ रोजी सामान्य गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. पण सर्व विद्यार्थी हे सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून अंतिम गुणवत्ता यादीच्या प्रतीक्षेत होते. भरतीसाठी वाट बघणाऱ्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी अ‍ॅड. असीम सरोदे व अ‍ॅड. तृणाल टोणपे, अ‍ॅड. अजिंक्य उडाणे यांच्या मार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

परंतु उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेमुळे अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या. मुख्य परीक्षेमध्ये चांगले गुण मिळून देखील त्यांना मिळणाऱ्या पदापासून वंचित रहावे लागत होते. विद्यार्थ्यांवर होणाऱ्या या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायालयामार्फत देण्यात आलेल्या निर्णयाविरुद्ध एमपीएससीद्वारे दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये विद्यार्थ्यांकडून हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली होती.

या याचिकेमध्ये दि. ४ ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीमध्ये दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाद्वारे दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेऊन अन्यायग्रस्त विद्यार्थांच्या बाजूने निर्णय देण्यात आला. यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करून कागदपत्रे तपासणीनंतर त्यांची सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदावर नियुक्ती करण्यात येईल.

उच्च न्यायालयात अशाप्रकारचे खटले प्रलंबित राहणे हा विद्यार्थांवर होणारा मोठा अन्याय आहे. ज्या तरुणांवरती भारताच्या प्रशासकीय सेवेची जबाबदारी आहे ते तरुण न्यायालयीन कचाट्यात अडकल्यामुळे त्यांना प्रशासकीय सेवेपासून वंचित रहावे लागते. म्हणून अशाप्रकारच्या खटल्यांसाठी स्वतंत्र खंडपीठ नेमून हे खटले लवकरात लवकर निकाली काढावेत

- अ‍ॅड. असीम सरोदे, कायदेतज्ञ

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षाCourtन्यायालय