शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दलितवस्ती निधीचा वापर इतरत्र केल्यास आंदोलन - बाळासाहेब चांदेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 01:20 IST

मुळशी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी दलितवस्ती अंतर्गत येणाऱ्या कामांचा निधी राजकीय पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे इतर ठिकाणी खर्च करू नये, तसे केल्यास नागरिकांच्या वतीने आंदोलन केले जाईल

पौड : मुळशी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी दलितवस्ती अंतर्गत येणाऱ्या कामांचा निधी राजकीय पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे इतर ठिकाणी खर्च करू नये, तसे केल्यास नागरिकांच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा मुळशी पंचायत समितीचे माजी उपसभापती व शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी दिला. सूस ग्रामपंचायतीच्या वतीने ६२ लाख रुपये खर्च करून उभारण्यात येणा-या बुद्धविहार समाजमंदिराचा भूमिपूजन समारंभ पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी. बी. एन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दीपक निकाळजे होते.ग्रामपंचायतीच्या वतीने समाजकल्याण अंतर्गत येणा-या रकमेमधून वरील काम हाती घेण्यात आले असल्याचे सूसचे सरपंच अपूर्वा निकाळजे यांनी सांगितले. गोरगरीब जनतेवर होण्या-या अन्यायासाठी आम्ही काम करत असून सूस ग्रामस्थांसाठी भरीव मदत करणार असल्याचे दीपक निकाळजे यांनी सांगितले. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य विजय केदारी, मा. नगरसेवक शेखर ओव्हाळ यांची भाषणे झाली.याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख विशाल पवार, रा.स.पा.तालुका अध्यक्ष अतुल सुतार, महिला तालुका संघटिका ज्योती चांदेरे, सूसगावच्या सरपंच अपूर्वा निकाळजे,उपसरपंच गजानन चांदेरे, मा. उपसरपंच सचिन चांदेरे,शुभांगी ससार, ग्रामपंचायत सदस्य अनिकेत चांदेरे, गणेश साळुंके,बाळू निकाळजे, ग्रामपंचायत सदस्या दीपाली पारखी, दिशा ससार,सीमा निकाळजे, मा.सरपंच नारायण चांदेरे,मीरा देवकर, मा.उपसरपंचमीना चांदेरे, मा. चेअरमन दत्तोबा चांदेरे,नवनाथ चांदेरे, तंटामुक्तीअध्यक्ष रोहिदास चांदेरे, बाळासाहेब भोते,सतीश चांदेरे, शाखाप्रमुख वाल्मीक चांदेरे, महिला आघाडी शाखाप्रमुख शांताबाई चांदेरे, सोमनाथ कोळेकर, अमित निकाळजे, शंकर चांदेरे, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच अपूर्वा निकाळजे यांनी केले.सूत्रसंचालन अ‍ॅड.तायडे यांनी केले.