शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

कांद्यावरील निर्यात मूल्य न हटविल्यास आंदोलन, आमदार सुरेशभाऊ गोरे यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 18:20 IST

कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले असून, नवीन गावरान कांदाही मोठया प्रमाणावर बाजारपेठेत आला आहे. त्यामुळे कांद्याचे भाव मागील आठवड्यापासून घसरण्यास सुरुवात झाली आहे

चाकण : कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले असून, नवीन गावरान कांदाही मोठया प्रमाणावर बाजारपेठेत आला आहे. त्यामुळे कांद्याचे भाव मागील आठवड्यापासून घसरण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र शासनाने कांद्यावरील किमान निर्यात मूल्य काढून टाकल्यास आणि निर्यातीसाठी प्रोत्साहनपर अनुदान देऊ केल्यास कांद्याच्या निर्यातीला चालना मिळेल आणि कांदा उत्पादकांना त्याचा लाभ मदत होणार आहे. मात्र कांद्याच्या बाबत शासनाची भूमिका दुटप्पी असून कांद्याचे भाव आणखी उतरण्यापूर्वी तातडीने निर्यात मूल्य न हटविल्यास शिवसेनेच्या वतीने शनिवारी (दि. ३ फेब्रुवारी) तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी दिला आहे.   महाराष्ट्र हे देशातील सर्वांत मोठे कांदा उत्पादक राज्य असून, कांद्याची सर्वाधिक निर्यातदेखील राज्यातूनच होते. यंदा कांद्याचे क्षेत्र देखील वाढून मागील वर्षी प्रमाणेच चांगले उत्पादन झाले आहे. सध्या कांद्याचा हंगाम सुरु झाला असून कांदा बाजारात आवक प्रचंड वाढली असल्याने कांद्याचे दर खाली आले आहेत. कांद्याचे भाव आवक प्रचंड वाढून पुढील काळात आणखी मोठया प्रमाणावर गडगडण्याची भीती आहे. केंद्र शासनाने कांद्याचे किमान निर्यातमूल्य भरमसाठ वाढवून ठेवलेले असल्याने कांदा उत्पादक व निर्यातदार त्याची निर्यात करु शकत नाहीत. सध्या कांद्याचे किमान निर्यात मूल्य ७०० डॉलर प्रति मेट्रिक टन आहे. हे किमान निर्यात मूल्य काढून टाकल्यास आणि मागील वर्षी प्रमाणे कांदा निर्यातीला प्रोत्साहन अनुदान दिल्यास कांद्याची निर्यात मोठया प्रमाणावर करता येऊन कांदा उत्पादकांना चांगला दर मिळणार आहे. त्यामुळे शासनाने तातडीने या बाबत कार्यवाही करावी अन्यथा शनिवारी चाकण येथे खेड तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे आमदार सुरेश गोरे यांनी सांगितले.