शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

एचआयव्हीबाधित चिमुकल्यांना आई-वडिलांची ‘ममता’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 03:37 IST

दुर्धर आजारामुळे समाज त्यांना नाकारतो, आप्त त्यांना दुरावतात. प्रेम आणि आपुलकीच्या स्पर्शाला दुरावलेली ही मुले दहा वर्षांपासून आई-वडिलांची ‘ममता’ अनुभवत आहेत.

प्राजक्ता पाटोळे  पुणे : दुर्धर आजारामुळे समाज त्यांना नाकारतो, आप्त त्यांना दुरावतात. प्रेम आणि आपुलकीच्या स्पर्शाला दुरावलेली ही मुले दहा वर्षांपासून आई-वडिलांची ‘ममता’ अनुभवत आहेत. कात्रज परिसरातील एक दाम्पत्याने निरपेक्ष भावनेमधून ‘एचआयव्ही’बाधित मुलांचे संगोपन करण्याचा ध्यास घेतला असूनप्रेमाला पारखी झालेली ही चिमणी पाखरं मायेची ऊब अनुभवत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा आणि अमर बुडूख या दोघांनी कात्रज येथील गुजर निंबाळकरवाडी भागात १० वर्षांपूर्वी ‘ममता फाउंडेशन’ नावाची संस्था सुरू केली. ज्यांच्या स्पर्शालाही लोक घाबरतात, अशा एड्सग्रस्त मुलांचा सांभाळ करायला त्यांनी सुरुवात केली. स्वत:ची कोणतीही चूक नसताना एचआयव्हीसारख्या आजाराला बळी पडलेल्या या चिमुकल्यांना त्यांनी हक्काचे अंगण आणि आकाश उपलब्ध करून दिले. या ठिकाणी २० मुली आणि १५ मुले अशी ३५ मुले आनंदाने खेळत-बागडत आहेत.आई-वडिलांच्या प्रेमापासून वंचित राहणाºया या मुलांच्या यातना पाहून संचालिका शिल्पा बुडूख भावनिक झाल्या. त्यामुळे त्यांचा सांभाळ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अनघा पुरोहित-परांजपे, सचिन पुरोहित, शरद सोनवणे, प्रताप निकम हे कार्यकर्ते रात्रंदिवस मुलांसोबत वेळ घालवतात.येथील बरीचशी मुले अनाथ आहेत, तर अनेकांचे नातेवाईक आणि पालकही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. मग या मुलांचे पालक कोण? असा प्रश्न त्यांच्या शाळांच्या दाखल्यांवर नाव लिहिताना पडतो. त्यामुळे सर्वच मुलांचे वडील म्हणून अमर बुडूख यांचे नाव लावले जाते आणि आई म्हणून शिल्पा यांचे. योग्य प्रकारे काळजी व औषधोपचार यामुळे या निरपराध चिमुकल्यांचे सरासरी आयुष्य वाढले आहे. मुलांच्या पुनर्वसनाचा प्रश्न संस्थेसमोर आहे.संस्थेला सहकार्य करणारे अनेक अदृश्य हातही आहेत. परंतु, या सेवाकार्यात कधीकधी समाजातील विकृतांचाही सामना करावा लागतो. या दुर्लब घटकांना सोबत घेऊन चालणा-यांची संख्या सुदैवाने मोठी आहे.

टॅग्स :Puneपुणे