शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पैशाच्या वादातून मुलाकडून आईचा खून

By admin | Updated: July 7, 2017 03:32 IST

सुदवडी- शिंदेवस्ती (ता. मावळ) येथे एका तरुणाने आईचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला असून खुनाच्या आरोपाखाली तरुणाला

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव दाभाडे : सुदवडी- शिंदेवस्ती (ता. मावळ) येथे एका तरुणाने आईचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला असून खुनाच्या आरोपाखाली तरुणाला तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पैशाच्या वादातून दारूच्या नशेत मुलाने झोपलेल्या आईच्या तोंडावर उशी दाबून खून केला. ही घटना गुरुवारी (दि. ६) पहाटे दोनच्या सुमारास सुदवडी येथील शिंदे वस्तीत घडली. सीताबाई यशवंत शिंदे (वय ६५ , रा. शिंदे वस्ती, सुदवडी, ता. मावळ) असे खून झालेल्या आईचे नाव आहे.प्रमोद यशवंत शिंदे (वय २७, रा. शिंदे वस्ती, सुदवडी, ता. मावळ) असे आरोपी मुलाचे नाव आहे.पोलीस उपनिरीक्षक विक्रम पासलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आई सीताबाई शिंदे तिचा मुलगा प्रमोद शिंदे यांनी दोन वर्षांपूर्वी शेत जमीन विकून घर बांधले होते. प्रमोद शिंदे याला दारूचे व्यसन असल्याने त्याचे पैशावरून आईशी घरात वारंवार खटके उडत असे. गुरुवारी (दि. ६) पहाटे २ च्या सुमारास आई सीताबाई शिंदे या गाढ झोपलेल्या असताना मुलगा प्रमोद शिंदे याने तिच्या तोंडावर उशी दाबून मारहाण केली. यात त्या दुर्दैवी मातेचा करुण अंत झाला. सीताबाई शिंदे या विधवा असून त्यांना दोन मुले आहेत. त्या एकत्रितपणे राहत होत्या. आरोपीचा भाऊ किरण शिंदे यांनी खुनाची फिर्याद तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे. आरोपीला शुक्रवारी वडगाव न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.