शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

वादातून आईनेच घोटला दोन चिमुकल्यांचा गळा; पतीवरही केले कोयत्याने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 17:42 IST

बाहेरच्या खोलीत झोपलेल्या नवऱ्याचा खून करण्याच्या मानसिकतेतून तिने त्याच्यावर कोयत्याने वार केला.

दौंड/पाटेठाण/ भिगवण : पती-पत्नीमध्ये झालेल्या घरगुती वादातून रागाच्या भरात आईने दोन चिमुकल्यांचा गळा दाबून मारले. तसेच झोपेत असलेल्या पतीवर कोयत्याने वार करत स्वतः पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथे शनिवारी पहाटे घडली असून, पतीला बारामती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.शंभू ऊर्फ हर्ष दुर्योधन मिंढे (३), पियू दुर्योधन मिंढे (१) अशी या चिमुकल्यांची नावे आहेत, तर पती दुर्योधन आबा मिंढे (३५) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी दौंड पोलिसांनी पत्नी कोमल दुर्योधन मिंढे (३०) हिला ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दुर्योधन मिंढे हे आयटी कंपनीमध्ये स्वॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. मात्र, दोन वर्षांपासून घरूनच वर्कफ्रॉम होम करत होते, तर कोमल हीदेखील बीएस्सी केमिस्ट्री झालेली आहे. दोघांमध्ये नेहमीच वाद होत होते. शुक्रवारी रात्रीही पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. त्यानंतर बेडरूममध्ये कोमल आणि तिची चिमुकली मुलगी पीयू झोपलेली होती. सर्वप्रथम तिने मुलीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर अन्य एका खोलीत आजीजवळ मुलगा शंभू झोपलेला होता. या मुलाला उचलून तिने बेडरूममध्ये आणले आणि त्याचाही गळा आवळून खून केला.त्यानंतर बाहेरच्या खोलीत झोपलेल्या नवऱ्याचा खून करण्याच्या मानसिकतेतून तिने त्याच्यावर कोयत्याने वार केला. यावेळी नवऱ्याने आरडाओरड केल्याने कोमल धावत आपल्या बेडरूममध्ये आली. तिने दरवाजा बंद करून घरातील चाकूने हाताच्या नस तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी घरातील लोकांनी दरवाज्याला धक्का दिल्याने दरवाजा उघडला आणि कोमल आत्महत्या करीत असताना तिला घरातील लोकांनी सावरले. मात्र यावेळी दोन चिमुकल्यांचा प्राण गेलेला होता.दुर्योधनवर बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची खबर मिळताच दौड पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय कुंभार, पोलिस उपनिरीक्षक घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कोमल मिंढे हिला ताब्यात घेतले आहे. दोन दिवसांपूर्वीच केला होता वाढदिवसकोमल आणि दुर्योधन यांचा मुलगा शंभू याचा दोन दिवसांपूर्वीच वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यामुळे घरी आनंदाचे वातावरण होते, मात्र किरकोळ भांडण झाल्याने कोमल हिने एवढे मोठे टोकाचे पाऊल उचलल्याने आसपासची वस्तीवरील मंडळी आणि नातेवाईक हळहळ व्यक्त करत आहेत.