पुणे : मसाल्यामध्ये पाणी सांडल्याच्या कारणावरून पाच वर्षीय चिमुरडीच्या सर्वांगावर जन्मदातीनेच चटके देऊन मातृत्वाला काळिमा फासल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेजारच्यांनी घरी आलेल्या मुलीच्या अंगावर व्रण पाहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. हडपसर पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.सोनी संतोष शेट्टी ( रा. गोंधळेनगर, हडपसर, पुणे) यांच्या शेजारी राहणाºया रजनीश तिवारी यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंधळेनगरमध्ये राहाणारे शेट्टी कुटुंब रोजंदारी करते. शेजारी राहणाºयांकडे चिमुरडी सातत्याने यायची-जायची. शुक्रवारी ती आली असता तिवारींना तिच्या अंगावर मारहाणीचे व्रण दिसले. विचारपूस केल्यानंतर केवळ मसाल्यामध्ये पाणी सांडल्यावरून तिला चटके दिल्याचे त्यांना समजले. शिवाय तोंडावर आणि शरीराच्या इतर भागावर मारहाण केल्याच्या खुणा होत्या. त्यांनी हडपसर पोलीस ठाणे गाठत संबंधित महिलेविरोधात तक्रार दिली. त्यानुसार महिलेला अटक करण्यात आली आहे.आ.नीलम गोºहे यांच्याकडून विचारपूसशिवसेना प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोºहे यांनी शनिवारी संध्याकाळी बालिकेची विचारपूस केली. अत्याचाराची घटना व तपासाबाबत हडपसर पोलीस स्टेशनच्या अधिकाºयांकडून माहिती घेतली.
आईनेच दिले चिमुरडीला चटके! मातृत्वाला काळिमा; मसाल्यामध्ये पाणी सांडल्याचे कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 02:51 IST