पुणे : पुण्याला स्वाइन फ्लूचा विळखा पडलेला असताना शहरातील नेमक्या कोणत्या भागात या आजाराचा जास्त प्रादुर्भाव झाला आहे, याची तपासणी करण्यासाठी पुणे महापालिकेने मॅपिंग केले. यामध्ये सहकारनगर, टिळक रस्ता, येरवडा, बिबवेवाडी या क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत येणाऱ्या भागांमध्ये स्वाइन फ्लूचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला असल्याचे दिसून आले आहे.पुण्यात गेल्या अडीच महिन्यांमध्ये स्वाइन फ्लूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. शहरात आतापर्यंत स्वाइन फ्लूची लागण झालेले ४७२ रुग्ण सापडले असून, त्यांपैकी ३४ जणांचा या आजाराने बळी घेतला आहे. शहरात कोणत्या भागात स्वाइन फ्लूचा जास्त प्रादुर्भाव आहे ती ठिकाणे शोधण्याच्या सूचना राज्य आरोग्य विभागाने पुणे महापालिकेला दिल्या होत्या. त्यानुसार मॅपिंग करून ही ठिकाणे पालिकेने शोधली आहेत.शहरात स्वाइन फ्लूचा सर्वाधिक प्रादुर्भाव सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या परिसरात झाला आहे. तेथे जानेवारीपासून आतापर्यंत लागण झालेले ६५ रुग्ण सापडले असून २ जणांचा बळी गेला आहे. यापाठोपाठ टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या परिसरातील २८ नागरिकांना स्वाइन फ्लूची लागण झाली आणि त्यांपैकी ६ जणांचा बळी गेला आहे. त्यापाठोपाठ संगमवाडी, येरवडा, हडपसर, बिबवेवाडी, कर्वे रस्ता या भागात स्वाइन फ्लूचा जास्त प्रादुर्भाव आहे. यामुळे तेथे बळीही गेले आहेत.(प्रतिनिधी)क्षेत्रीय कार्यालयनिहाय प्रादुर्भावाची स्थितीक्षेत्रीय कार्यालयरुग्णबळीसंगमवाडी१२१येरवडा२५२ढोले-पाटील रस्ता९०कसबा पेठ१४०भवानी पेठ१४०हडपसर४४१बिबवेवाडी३८१सहकारनगर६५२टिळक रस्ता२८६कर्वे रस्ता३७१वारजे-कर्वेनगर१६०औंध२३०घोले रस्ता६०
सहकारनगर, टिळक रस्ता, येरवड्यात सर्वाधिक फैलाव
By admin | Updated: March 5, 2015 00:28 IST