शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-लोणावळा लोकलमध्ये सर्वाधिक फुकटे प्रवासी, प्रशासनाची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 05:42 IST

मध्य रेल्वेच्या पुणे विभागात लोणावळा लोकलमध्ये इतर मार्गांच्या तुलनेत सर्वाधिक फुकटे प्रवासी आढळून आले आहेत. विशेष म्हणजे पुणे ते लोणावळादरम्यान रेल्वेचे केवळ १५ रुपयांचे तिकीट आहे. असे असतानाही अनेक प्रवाशांकडून विनातिकीट प्रवास केला जात असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागात लोणावळा लोकलमध्ये इतर मार्गांच्या तुलनेत सर्वाधिक फुकटे प्रवासी आढळून आले आहेत. विशेष म्हणजे पुणे ते लोणावळादरम्यान रेल्वेचे केवळ १५ रुपयांचे तिकीट आहे. असे असतानाही अनेक प्रवाशांकडून विनातिकीट प्रवास केला जात असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.पुणे विभागाकडून पुणे लोणावळा, पुणे-बारामती, पुणे-मिरज आणि मिरज कोल्हापूर या मार्गावर तिकीट तपासणी मोहीम राबविली जात आहे. या तपासणीमध्ये एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत २ लाख ३४ हजार प्रवाशांना पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून तब्बल १३ कोटी १० लाख ३३ हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला. या प्रवाशांपैकी १ लाख १३ हजार ४०५ प्रवासी विनातिकीट आढळून आले. त्यांना ६ कोटी ३२ लाख ८२ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर, अतिरिक्त व्यवस्थापक प्रफुल्ल चंद्रा यांच्या मार्गदर्शनाने वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली.रेल्वे प्रशासनाने केलेल्या कारवाईमध्ये सर्वाधिक फुकटे प्रवासी पुणे-लोणावळा मार्गावर आढळून आले आहेत. या लोकलचे तिकीट सर्वात कमी आहे.पुणे ते आकुर्डीदरम्यान पाच रुपये, पुणे ते देहूरोडदरम्यान १० रुपये, तर पुणे ते लोणावळादरम्यान १५ रुपये तिकीट दर आहे. याशिवाय या स्थानकांदरम्यान मासिक तिकिटासाठी अनुक्रमे १००, १८५ आणि २७० रुपये दर आहे. या तिकिटावर संबंधित प्रवाशांना कितीही वेळा ये-जा करता येऊ शकते. असे असताना विनातिकीट प्रवाशांची संख्या अधिक असल्याने प्रशासनाकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.माहिती संकलित करणारपुणे-लोणावळा मार्गावरील फुकट्या प्रवाशांचे प्रमाण वाढल्याने रेल्वे प्रशासन यावर नियंत्रण मिळविण्यासाठी गांभीर्याने विचार करीत आहे. यापुढील काळात हे प्रमाण कमी न झाल्यास विनातिकीट प्रवाशांची नावे, छायाचित्र, पत्ता, मोबाईल क्रमांक ही माहिती संकलित केली जाईल. त्याआधारे पुढील कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

टॅग्स :Puneपुणे