शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेशाचे पुण्यातून सर्वाधिक अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 02:30 IST

सहा दिवसांत ९० हजार अर्ज; नागपुरात जागांपेक्षा जास्त अर्ज

पुणे : शिक्षण हक्क कायद्या (आरटीई) अंतर्गत दिल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी राज्यभरातील पालकांची झुंबड उडाली आहे. केवळ सहा दिवसांतच राज्यभरातून तब्बल ९० हजारांहून अर्ज भरण्यात आले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक २१ हजारांहून अधिक अर्ज एकट्या पुणे जिल्ह्यातील आहेत, तर पुण्यासह नागपूर जिल्ह्यात सहा दिवसांतच प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक अर्ज आले आहेत.शिक्षण विभागाकडून दि. ५ मार्चपासून आरटीई प्रवेशाची आॅनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पालकांना आरटीईचे संकेतस्थळ किंवा अ‍ॅपवरून अर्ज भरण्यासाठी उपलब्ध आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी ही प्रक्रिया सुरू आहे. राज्यात या प्रक्रियेमध्ये एकूण ९ हजार १९४ शाळांमधील १ लाख १६ हजार ८०३ जागा आरटीईसाठी आरक्षित आहेत. त्यासाठी मागील सहा दिवसांतच ९० हजार ७५१ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १३७ अर्ज अ‍ॅपवरून भरण्यात आले आहेत. अर्ज भरण्यासाठी दि. २२ मार्चपर्यंत मुदत आहे. त्यामुळे सध्याचा प्रतिसाद पाहता प्रवेश क्षमतेपेक्षा अर्जांची संख्या अधिक होण्याची शक्यता आहे.राज्यात सर्वाधिक १६ हजार ६१६ जागा पुणे जिल्ह्यात आहेत. त्यासाठी २१ हजारांहून अधिक पालकांनी अर्ज केला आहे. ही परिस्थिती नागपूर जिल्ह्यातही आहे. येथील सुमारे ७ हजार जागांसाठी तब्बल सुमारे १३ हजार अर्ज आले आहेत. अकोला, अमरावती, भंडारा, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातही उपलब्ध जागांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. तर इतर काही जिल्ह्यांमध्येही पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पुढील काही दिवसांत या जिल्ह्यांतील अर्जांची संख्याही क्षमतेपेक्षा अधिक असणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये हजारो इच्छुक पालकांच्या पाल्यांना आरटीईअंतर्गत प्रवेश मिळणार नाही, हे स्पष्ट आहे.अनेक जिल्ह्यात प्रतिसादच मिळेनाकाही जिल्ह्यांमध्ये मात्र अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. सिंधुदुर्ग व नंदुरबार जिल्ह्यात अनुक्रमे ५० व ९२ अर्ज आले आहेत. ठाणे जिल्ह्यात १३ हजार ४०० प्रवेशांसाठी केवळ ६ हजार ४१९ पालकांनी अर्ज केले आहेत.मुंबईची हीच स्थिती आहे. सुमारे १० हजार जागांसाठी २ हजार अर्ज आलेले आहे. अर्ज भरण्याच्या मुदतीपर्यंत हीच स्थिती कायम राहिल्यास मुंबईसह ठाणे व इतर काही जिल्ह्यांतील जागा रिक्त राहतील.