शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मोशीत पोलिसांनी रोखला बालविवाह

By admin | Updated: December 1, 2014 03:40 IST

पंधरा आणि चौदा वर्षांच्या मुला-मुलींचा मोशी येथे विवाह लावण्याचा प्रयत्न रविवारी एमआयडीसी पोलिसांनी उधळून लावला. याप्रकरणी पोलिसांनी मध्यस्थाला अटक केली

पिंपरी : पंधरा आणि चौदा वर्षांच्या मुला-मुलींचा मोशी येथे विवाह लावण्याचा प्रयत्न रविवारी एमआयडीसी पोलिसांनी उधळून लावला. याप्रकरणी पोलिसांनी मध्यस्थाला अटक केली असून, नियोजित वधू-वरांचे आजोबा पसार झाले आहेत. तिघा आरोपींविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका स्वयंसेवी संस्थेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली.जितू राजपूत (वय २३, रा. धानोरी फाटा, आळंदी) असे अटक केलेल्या मध्यस्थीचे नाव आहे. वधूचे आजोबा व वराचे आजोबा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघेही पसार आहेत. सहायक पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिलेली माहिती अशी : तिन्ही आरोपींविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा कलम ११ नुसार दाखल करण्यात आला आहे. मोशी येथे बालविवाह होणार असल्याची माहिती रविवारी सकाळी पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार पोलीस बोरहाडेवाडी परिसरात गेले. तेथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या आवारासमोरील मैदानात मंडप टाकल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. चौकशी केली असता केवळ साखरपुडा होणार असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. त्यामुळे पोलीस तेथून निघून गेले. दुपारी एकच्या सुमारास पुण्यातील एका स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीने बोरहाडेवाडी परिसरात निर्जनस्थळी बालविवाह होणार असल्याचे एमआयडीसी पोलिसांना दूरध्वनीवरून सांगितले. त्यानंतर पोलीस पुन्हा बोऱ्हाडेवाडीकडे गेले. तेथे एका झाडाखाली विवाह सुरू होता. त्याठिकाणी दोनशेपेक्षा अधिक लोक जमा झाले होते. पोलीस जवळ येताच उपस्थितांनी पळ काढण्यास सुरूवात केली. पोलिसांनी मध्यस्थ जितू राजपूत याला अटक केली. मात्र, वधू-वराचे नातेवाईक पसार झाले. जितूकडे कसून चौकशी केली असता बालविवाह लावण्याचा प्रयत्न केल्याची कबुली त्याने दिली. (प्रतिनिधी)