चौकट १ :-
दोन हजारांच्या पुढेच सक्रिय रुग्ण
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र शहरात गेल्या दोन महिन्यांपासून दिसत आहे़ परंतु, गेली दोन महिने प्रत्येक दिवशी शहरातील सक्रिय रुग्ण संख्या ही काही २ हजारांच्या खाली आली नाही़ कधी २ हजार २०, तर कधी २०४० अशीच ही सक्रिय रुग्णांची आकडेवारी राहिली़ मात्र, सक्रिय रुग्णांची ही संख्याही सोमवारी २ हजारांच्या आत आली असून, यापैकी सुमारे ६५ टक्के रुग्ण हे सौम्य लक्षणे असल्याने घरीच विलगीकरणात आहेत़ कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत यापूर्वी पुण्यात ७ फेब्रुवारी, २०२१ रोजी सक्रिय रुग्णसंख्या ही १ हजार ३८३ इतकी खाली आली होती़
-----------------
चौकट २ :-
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्ण संख्या ही २०५ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २४५ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत ३० लाख ६८ हजार २१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९१ हजार ९५९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ८१ हजार १३३ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ८९० जणांचा मृत्यू झाला आहे.
---------------------