शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्ध जीवन’ची आणखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:09 IST

पुण्यातील नऱ्हे आंबेगावात २ फ्लॅटमधून मिळाली कागदपत्रे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणात समृद्ध जीवन फूड्स आणि ...

पुण्यातील नऱ्हे आंबेगावात २ फ्लॅटमधून मिळाली कागदपत्रे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणात समृद्ध जीवन फूड्स आणि समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कंपनीवर देशभरात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) करीत आहेत. सीआयडीच्या तपास पथकाला नऱ्हे आंबेगाव येथील २ फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे सापडली असून, त्यातून कंपनीची आणखी काही मालमत्ता समोर आली आहे. गुरुवारी सकाळपासून सीआयडीचे १२ जणांचे पथक ही कागदपत्रे छाननी करण्याचे काम करीत असून, ते उद्याही सुरू राहणार आहे.

सीआयडीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा पाटील यांच्या नेतृत्वाखाली समृद्ध जीवनचा तपास करण्यात येत आहे. या गुन्ह्यात एकूण २५ आरोपी असून त्यापैकी सीआयडीने महेश मोतेवार याच्यासह १७ जणांना अटक केली आहे. समृद्ध जीवनची काही कागदपत्रे हलविली जात असल्याची माहिती सीआयडीच्या या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संबंधितांवर पाळत ठेवून ते कोठे जात आहेत, त्यांचा पाठलाग केला. नऱ्हे आंबेगाव येथील एका इमारतीत ते गेले. या इमारतीतील दोन फ्लॅटमध्ये ही कागदपत्रे ठेवण्यात आली होती. तसेच एका दुकानातही काही कागदपत्रे ठेवली असल्याचे आढळून आले.

मनीषा पाटील, ३ पोलीस निरीक्षकांसह १२ जणांचे पथक आज दिवसभर या कागदपत्रांची पडताळणी करीत होते. ‘समृद्ध जीवन’ने देशभरात कोठे कोठे मालमत्ता खरेदी केली. कोठे जमीन आहे यासंबंधित ही कागदपत्रे आहेत.

महेश मोतेवार यांनी ‘समृद्ध जीवन’मार्फत गुंतवणूकदारांची आतापर्यंत साडेतीन हजार कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्यापैकी त्याच्या अनेक मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. या कागदपत्रांमधून ‘समृद्ध जीवन’ची आतापर्यंत ज्ञात नसलेली मालमत्ता समोर आली आहे. ती जप्त करण्यासाठी ही कागदपत्रे सीआयडीला उपयुक्त ठरणार आहेत.