शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अभिनयापेक्षा दिग्दर्शन जास्त तणावाचे- मृणाल कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 03:52 IST

दिग्दर्शन करीत असताना आपल्याबरोबर तांत्रिकदृष्ट्या काम करणाऱ्या शंभर जणांबरोबर आपल्याला जुळवून घ्यावे लागते, त्यामुळे अभिनयापेक्षा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात जास्त तणाव असल्याचे मत प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

पुणे : अभिनय करत असताना आपण केवळ स्वत:च्या कामावर लक्ष देत, ते चांगल्या पद्धतीने कसे होईल याचा विचार करीत असतो, मात्र दिग्दर्शन करीत असताना आपल्याबरोबर तांत्रिकदृष्ट्या काम करणाऱ्या शंभर जणांबरोबर आपल्याला जुळवून घ्यावे लागते, त्यामुळे अभिनयापेक्षा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात जास्त तणाव असल्याचे मत प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केले. लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात गेले तीन दिवस सुरु असलेल्या महिला चित्रपट महोत्सवाचा समारोप आज मृणाल कुलकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी त्या बोलत होत्या.आयाम महिला गटाच्या सदस्या मनस्विनी प्रभुणे, नम्रता फडणीस, प्राची बारी, मेघा शिंपी, स्वाती जरांडे, अपर्णा देगांवकर, आशय फिल्म क्लबचे सतीश जकातदार, वेलकम होम चित्रपटातील छोटी अभिनेत्री प्रांजली श्रीकांत आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित ‘वेलकम होम’ हा चित्रपटदेखील दाखविण्यात आला. यामध्ये मृणाल कुलकर्णी, सुमीत राघवन, स्पृहा जोशी आणि डॉ. मोहन आगाशे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.महिला पत्रकारांचा आयाम गट, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, आशय फिल्म क्लब आणि फेडरेशन आॅफ फिल्म सोसायटी आॅफ इंडिया यांच्या वतीने या महिला चित्रपट महोत्सावाचे आयोजन करण्यात आले होते. ‘तिच्या नजरेतून सिनेमा’ ही यावर्षीच्या महिला चित्रपट महोत्सवाची संकल्पना असून यात इजिप्त, बांगलादेश, फ्रान्स, श्रीलंका, तजाकिस्तान या देशांतील चित्रपटांचा रसिकांनी आस्वाद घेतला.मनस्विनी प्रभुणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.‘वेलकम होम’मध्ये नात्यांचे अनेक पदरतुम्ही स्वत:ला प्रेरणा कशी देता या प्रश्नाचे उत्तर देताना मृणाल कुलकर्णी म्हणाल्या की, आपल्या आवडत्या कामामध्ये स्वत:ला बुडवून घेत त्यातून नवनवीन शिकण्याचा, सकारात्मक राहण्याचा मी नेहमीच प्रयत्न करीत असते. 'वेलकम होम' या चित्रपटात स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये असलेल्या नवरा-बायको या नात्यांमधील क्लिष्टता, अनेकविध पदर मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला असून, त्यातून प्रत्येकाने आपापले उत्तर शोधणे अपेक्षित असल्याचे मत या वेळी डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.दिग्दर्शन क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या प्रत्येकासाठी सुमित्रा मावशींचे सिनेमे हे जणू मेजवानीच असतात. त्यांच्या कथेतील साधेपणा, संवाद आणि प्रामाणिकपणे प्रश्न मांडण्याची पद्धत आम्हा सर्वांनाच भावते. त्यांच्यासोबत काम करणे हा एक वेगळा अनुभव असतो. आपल्या मधील अनेक वेगळ्या गुणांची ओळख कलाकाराला त्यांच्या चित्रपटात काम करीत असताना होते, असे मला नेहमी जाणवते. - मृणाल कुलकर्णी