शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

विनोदातील ‘राजा’चे होणार स्मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 02:49 IST

कै. राजा गोसावी प्रतिष्ठानचा पुढाकार

नम्रता फडणीसपुणे : निरागस आणि सहजसुंदर अभिनयातून विनोदातील ‘राजा’ने अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आजही ‘राजा गोसावी’ नावाची जादू ओसरलेली नाही. आयुष्यभर प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू उमटविणाऱ्या या विनोदवीराच्या स्मृती आता कायमस्वरूपी जतन होणार आहेत. कै. राजा गोसावी प्रतिष्ठानने राजा गोसावी यांचे स्मारक उभारण्यासाठी पुढाकार घेतला.

‘सौजन्याची ऐशीतैशी’, ‘करायला गेलो एक’, ‘लग्नाची बेडी’, ‘डार्लिंग डार्लिंग’ यासारख्या विविध व्यावसायिक नाटकांसह ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘संशयकल्लोळ’ यासारखी संगीत नाटके तसेच ‘अवघाची संसार’, ‘आंधळा मागतो एक डोळा’, ‘लाखाची गोष्ट’, ‘हा खेळ सावल्यांचा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये राजा गोसावी यांनी अभिनयाचे दर्शन घडविले.इतकी लोकप्रियता लाभलेल्या या प्रतिभावंत कलावंताचे स्मारक साताºयापासून दहा किलोमीटरवर असलेल्या ‘लिंब’ या गावी करण्याचा प्रतिष्ठानने निर्णय घेतला आहे. ‘लिंब’मधील गौरीशंकर कॉलेजच्या मागची जागा प्रतिष्ठानने शासनाकडे मागितली. याला शासनाने हिरवा कंदील दिल्याची माहिती कै. राजा गोसावी प्रतिष्ठानचे अध्यक्षदिनेश गोसावी यांनी ‘लोकमत’ला दिली.जेजुरी देवस्थानचे माजी विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे हे स्मारक उभारणीसाठी प्रयत्नशील आहेत.स्वतंत्र कलादालन...४या स्मारकात राजा गोसावी यांच्या नाटक , चित्रपटांचे स्वतंत्र कलादालन, त्यांच्या कलाकृती दाखविण्यासाठी मिनी थिएटरची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. मात्र, केवळ स्मारकापुरतेच याचे स्वरूप मर्यादित न ठेवता तरुण पिढीसाठी अभिनयाच्या कार्यशाळांवर अधिक प्रमाणात भर दिला जाणार आहे. जुन्या कलाकारांच्या अभिनयाचा अभ्यास नव्या पिढीने करावा, हा कार्यशाळा घेण्यामागचा हेतू आहे.४पूर्वी फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय)मध्ये ‘विनोद’ हा विषय अभ्यासक्रमाला होता. राजा गोसावी यांची नाटके, चित्रपट आवर्जून पाहा, असे सांगितले जायचे. हे स्वत: अभिनेते असरानी यांनी आम्हाला सांगितले होते. ज्येष्ठ कलाकारांचा अभिनय आज तरुण पिढीला पाहायला मिळत नाही.४मात्र, जुन्या कलाकारांची नावे आजही लोकांच्या स्मरणात आहेत. राजा गोसावी यांचा सहजसुंदर अभिनय, त्यांची विनोदाची पद्धत कार्यशाळेमधून शिकविली जाणार आहे. मेकअप, वेशभूषा आदी चित्रपटांशी निगडित विविध कलांचे ज्ञानही युवा पिढीला देणार आहोत.

टॅग्स :Puneपुणे