शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात एक महिन्याच्या संपाला सुरुवात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 19:28 IST

दारूगोळा निर्मिती कारखान्यांत दरवर्षी सुमारे ५२ हजार कोटी रुपयांच्या उत्पादनांची निर्मिती केली जात असून सरकार या कारखान्यांचे खासगीकरण करण्याच्या तयारीत आहे..

ठळक मुद्देदेहूरोड आयुध निर्माणातील सर्व कामगार संघटनांचा सहभाग देशातील ऑर्डनन्स फॅक्टरी बोडार्अंतर्गत संपूर्ण देशात एकूण ४१ दारूगोळा निर्मिती कारखाने

देहूरोड : केंद्र सरकारने देशभरातील दारूगोळा निर्मिती कारखान्यांचे (ऑर्डनन्स फॅक्टरीज) खासगीकरण करण्याचे धोरण निश्चित करत आहेत. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाविरोधात गेले महिनाभर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आयुध निमार्णीतील सर्व कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने विविध मार्गांनी आंदोलने केली. मात्र, सरकारने दखल न घेतल्याने मंगळवारी सकाळपासून एक महिन्याचा संपाला सुरुवात केली आहे. संपात देहूरोड येथील आयुध निर्माणातील(ऑर्डनन्स फॅक्टरी) सर्व कामगार संघटनांनी सहभाग घेतला आहे. देशातील ऑर्डनन्स फॅक्टरी बोडार्अंतर्गत संपूर्ण देशात एकूण ४१ दारूगोळा निर्मिती कारखाने आहेत. यात सुमारे पाच लाख कर्मचारी कार्यरत असून या कारखान्यांमध्ये दारूगोळा व शस्त्रास्त्रांबरोबरच संरक्षण मंत्रालयासाठी आवश्यक विविध उत्पादनांचे उत्पादन घेण्यात येते. दारूगोळा निर्मिती कारखान्यांत दरवर्षी सुमारे ५२ हजार कोटी रुपयांच्या उत्पादनांची निर्मिती केली जात असून सरकार या कारखान्यांचे खासगीकरण करण्याच्या तयारीत आहे. विविध शस्रास्त्रे निर्माण करणाऱ्या कारखान्यांचे महामंडळात रूपांतर करण्याची सरकारची योजना आहे. एकीकडे सरकार 'मेक इन इंडिया'ची भाषा करत असून दुसरीकडे  कारखान्यांचे खासगीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. अर्थसंकल्पात ऑर्डनन्स फॅक्टरीजसाठी पुरेशी आर्थिक तरतूद केलेली नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी संघटनांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून सरकारच्या निर्णयाविरोधात एक महिन्याच्या संपाचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारी देहूरोड येथील आयुध निर्माणच्या सर्व कामगार संघटनाच्या सदस्य कामगारांनी संपात सहभाग घेत सरकारच्या निर्णयाविरोधात निषेध नोंदविला आहे.  संपात इंटक, ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉइज फेडरेशन, इंडियन नॅशनल डिफेन्स वर्कर्स फेडरेशन, भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ, टीयुसीसी, जेडब्लूएम , एआयएएनजीओ व पॅरामेडिकल असोसिएशन या सर्व संघटनांचे पदाधिकारी व कामगार सहभागी झाले आहेत. संप सकाळपासून शांततेत सुरु असून पुढील एक महिना संप सुरु ठेवण्यात येणार असल्याचे कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. दरम्यान एक महिन्याच्या संपाच्या पार्श्वभूमीवर देहूरोड पोलीस ठाण्याच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

टॅग्स :dehuroadदेहूरोडGovernmentसरकार