शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मिळकत कर सवलतीसाठी महिन्याची मुदतवाढ

By admin | Updated: May 24, 2017 04:35 IST

महापालिकेचा मिळकत कर सवलतीच्या दरात भरण्यासाठी आता पुन्हा एक महिन्याची मुदतवाढ देण्यात येणार आहे. याबाबत मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महापालिकेचा मिळकत कर सवलतीच्या दरात भरण्यासाठी आता पुन्हा एक महिन्याची मुदतवाढ देण्यात येणार आहे. याबाबत मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सवलतीच्या दरात मिळकत कर भरण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. अनेक नागरिकांनी अद्यापही पालिकेचा मिळकत कर भरला नसल्याने त्यांना सवलतीमध्ये हा कर भरता यावा, यासाठी हा प्रस्ताव आयत्यावेळी मांडून दाखल मान्य करण्यात आला.महापालिकेच्या वतीने ३१ मे पर्यंत मिळकत कर भरणाऱ्या नागरिकांना करामध्ये ५ ते १० टक्के कर सवलत दिली जाते. तर आॅनलाईन मिळकत कर भरणाऱ्यांना दोन टक्के वाढीव सवलतदेखील महापालिकेच्या वतीने दिली जाते. शहरात सुमारे साडेआठ लाख मिळकती असून या सर्वांना पालिकेच्या मिळकत विभागाने बिले पाठविली आहेत. नागरिकांनी आपला कर वेळेत भरावा, यासाठी पालिकेने सवलत जाहीर केली आहे. गेल्या काही वर्षांपासून एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत ही सवलत दिली जाते. या सवलतीचा लाभ घेत बहुतांश नागरिक पहिल्या दोन महिन्यांमध्येच कर भरत असल्याने पालिकेच्या तिजोरीत मोठी रक्कम जमा होते. मागील वर्षी एक महिन्याची वाढीव मुदत नागरिकांना देण्यात आली होती. मात्र यंदाच्या वर्षी ही मुदत दिली जाणार नाही, असे प्रशासनाने जाहीर केले होते.परंतु, पालिकेच्या मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत आयत्यावेळेस सर्वपक्षीय सभासदांनी मिळकत कर भरण्यास एक महिन्याची मुदतवाढ द्यावी, असा प्रस्ताव मांडला. त्याला बैठकीत मान्यता देण्यात आली.मंगळवारपर्यंत मिळकत करापोटी ४१० कोटी रुपयांचा महसूल पालिकेकडे भरण्यात आला आहे. सुमारे ४ लाख ६ हजार नागरिकांनी हा मिळकत कर भरला असून यामध्ये १ लाख ८८ हजार नागरिकांनी आॅनलाईन कर भरला आहे.