शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डीआयसीची मान्यता नसल्याने रखडले पैसे,लोकसेवा बँकेच्या ठेवीदारांची रक्कम अडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 05:43 IST

विमा महामंडळाने (डीआयसीजीसी) अद्याप परवानगी दिली नसल्याने लोकसेवा सहकारी बँकेतील ठेवीदारांची रक्कम अडकली असल्याची माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली. लोकसेवा बँकेच्या प्रशासकांनी १७ कोटी रुपये वाटपाची परवानगी विमा महामंडळाकडे मागितली होती.

पुणे : विमा महामंडळाने (डीआयसीजीसी) अद्याप परवानगी दिली नसल्याने लोकसेवा सहकारी बँकेतील ठेवीदारांची रक्कम अडकली असल्याची माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली. लोकसेवा बँकेच्या प्रशासकांनी १७ कोटी रुपये वाटपाची परवानगी विमा महामंडळाकडे मागितली होती. परवानगीचे स्मरणपत्र पाठवूनदेखील महामंडळाने त्याचे उत्तरदेखील दिलेले नाही. त्यामुळे केवळ मान्यतेची मोहोर नसल्याने सामान्य ठेवीदारांचे पैसे त्यांच्याच खात्यात अडकले आहेत.रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे निर्बंध असल्याने लोकसेवा बँकेतील व्यवहार ठप्प आहेत. लोकसेवा बँकेच्या एक लाख रुपयांच्या आत ठेवी असणाºया ठेवीदारांची संपूर्ण रक्कम जानेवारी महिनाअखेरीस देण्याची तयारी लोकसेवा बँकेच्या प्रशासकांनीकेली होती. या निर्णयाचाफायदा बँकेच्या साडेसात हजार खातेदारांना मिळणार आहे. डीआयसीजीसीने ठेवीदारांना पैसे देण्याची परवानगी द्यावी, यासाठी बँकेकडून २२ जानेवारी २०१८ रोजी डीआयसीजीसीला पत्र पाठविले होते. विशेष म्हणजे डीआयसीजीसीवर कोणताही बोजा न पडता बँक स्वत:च्या निधीतून पैशांचे वाटप करणार आहे.असे असूनही डीआयसीजीसीकडून कोणतेच उत्तर आले नाही. डीआयसीजीसीकडून उत्तर न आल्याने बँकेच्या प्रशासकांच्या वतीने ६ फेब्रुवारीला परवानगी देण्यासाठी स्मरणपत्र पाठविण्यात आले. त्याचेही उत्तरही देण्यात आलेले नाही. आता दुसरे स्मरणपत्र पाठविण्याची तयारी बँकेकडून करण्यात आली आहे.बँकेकडून ९ हजार ९७ ठेवीदारांची यादी तयारबँकेकडून ९ हजार ९७ ठेवीदारांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यात एक लाख रुपयांच्या आत ठेवी असलेले साडेसात हजार ठेवीदार आहेत. त्यांना १७ कोटी रुपयांचे वाटप करण्याची बँकेची तयारी आहे. लोकसेवा बँकेला १८० कोटी रुपयांच्या ठेवी द्यायच्या आहेत. त्यात ८८ पतसंस्थांच्या १२१ कोटी रुपयांचा समावेश आहे, तर दीड हजार ठेवीदारांचे ४२ कोटी रुपये देणे आहे. बँकेकडे सप्टेंबर २०१७ अखेरीस १२८ कोटी रुपयांची रोखता (लिक्विडिटी) आहे. तसेच जानेवारी महिन्यापर्यंत ४ कोटी रुपयांची वसुली केली आहे, तर ठेवींवर एक कोटी रुपयांचे व्याज मिळाले आहे. त्यामुळे रोखता १३३ कोटी रुपयांवर गेली आहे. एक लाख रुपयांआतील ठेवीदारांचे पैसे सोडून १६३ कोटी रुपयांचे देणी उरतात. त्याची बँकेकडील रोखतेशी तुलना केल्यास जवळपास सर्वच ठेवीदारांना ७० टक्के रक्कम देता येईल. त्यानुसारच बँकेकडून नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Puneपुणे