पुणे: पुणे रेल्वे स्थानकावर चोरलेले मोबाईल विक्री करण्यासाठी आलेल्या चोरास पुणे लोहमार्ग पोलिसांनी पकडले. या वेळी त्याच्याकडून चार मोबाईल व चोरलेली दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली. या प्रकरणी राहुल ऊर्फ शामसुंदर मोहळे (वय २६, व्यवसाय पेंटिंगकाम, रा. श्रीराम सोसायटी, चंदननगर) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यावर अन्य गुन्हेदेखील दाखल आहे.
लोहमार्ग पोलिसांना आरोपी राहुल हा मोबाईलची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार सोमवारी पुणे स्थानकावर पोलिसांनी सापळा लावला होता. तो येताच त्याला पकडण्यात आले. त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीची दुचाकी व अन्य चार मोबाईल असे मिळून ८६,८८९ रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. आरोपी राहुल याच्याविरोधात विविध पोलीस स्टेशनमध्ये ११ गुन्हे दाखल आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक मौला सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक पल्लवी काळे, सहायक पोलीस फौजदार भीमा हगवणे, प्रशांत डोईफोडे, अतुल भुजबळ, विकास केंद्रे, प्रशांत पानसरे आदींनी केली.