शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
3
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
4
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
5
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
6
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
7
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
8
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
9
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
10
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
11
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
12
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
13
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
14
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
15
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
16
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
17
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
18
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
19
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
20
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 

पुणेकरांचे नेटवर्क गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 5:29 PM

गेल्या अनेक दिवसांपासून काॅलड्राप हाेणे, रेंज नसणे अश्या समस्यांना पुणेकरांना सामाेरे जावे लागत अाहे. त्यामुळे पुणेकर पुरते हैराण झाले असून यावर लवकरात लवकर उपाय शाेधण्याची मागणी अाता ते करत अाहेत.

ठळक मुद्देसातत्याने हाेताेय काॅलड्राॅपफक्त पुण्यातच येताेय हा अनुभव

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकरांना काॅलड्रापचा तसेच फाेनला नेटवर्क नसल्याचा अनुभव येत अाहे. त्यामुळे पुणेकर पुरते हैरान झाले असून शहर स्मार्ट हाेतंय पण नेटवर्क कंपन्या कधी स्मार्ट हाेणार असा प्रश्न उपस्थित करत अाहेत.    गेल्या काही दिवसांपासून सातत्याने काॅल सुरु असातना अचानक कट हाेत असल्याचा अनुभव पुणेकरांना येत अाहे. अनेकदा एखाद्याला फाेन लावल्यास वेगळाच अावज एेकू येत अाहे. त्याचबराेबर फाेरची नेटवर्कचा सगळीकडे बाेलबाला असताना थ्रीजीवर सुद्धा इंटरनेट व्यवस्थित चालत नाहीये. त्यामुळे पैसे फाेरजी चे सुविधा टुजीच्या अशी परिस्थिती पुणेकरांची झाली अाहे. एका क्लुप्तीने लाेकांचे जीवन बदलून टाकणाऱ्या एका कंपनीच्या ग्राहकांमध्ये माेठी नाराजी पाहायला मिळत अाहे. प्रत्येक काॅल हा चालू असताना कट हाेत असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत अाहे. अामचं नेटवर्क स्ट्राॅंग अाहे, अामचे सर्वात जास्त ग्राहक अाहेत. फाेरजी मध्ये अाम्ही सर्वात पुढे अाहाेत अश्या माेठ-माेठाल्या जाहीराती करणाऱ्या कंपन्यांचे वास्तव यानिमित्ताने समाेर येत अाहे.     याविषयी बाेलताना अनुज देशपांडे हा तरुण म्हणाला, गेल्या अनेक दिवसांपासून काॅल ड्रापचा अनुभव मला येताेय. काॅल सुरु असताना अनेकदा काॅल अचानक कट हाेत अाहे. त्याचबराेबर फाेन ठेवल्यावर काही सेकंदांनी फाेन डिस्कनेट हाेत अाहे. नेटवर्कच्या बाबतीतही सारखाच अनुभव अाहे. सातत्याने नेटवर्क कमी जास्त हाेत असल्याने इंटरनेट अाणि इतर साेशल माध्यमे वापरताना अनेक अडचणी येत अाहेत. मुक्ता लेले म्हणाली, गेल्या दाेन महिन्यांपासून मला हा अनुभव येत अाहे. मला फाेन करणाऱ्यांना माझा फाेन बरेचदा अाऊट अाॅफ कव्हरेज दाखवत अाहे. तर फाेन लागण्यासही अनेक अडचणी येत अाहेत. नाट्यक्षेत्रात मी काम करत असल्याने अनेक कामांचे फाेन केले जातात. मात्र काॅल ड्रापमुळे बाेलणं अर्धवट राहत अाहे.     हा अनुभव फक्त पुण्यातच येत अाहे. इतर शहरांमध्ये ही समस्या जाणवत नसल्याचे अनेकांचे म्हणणे अाहे. मुळच्या पुण्याच्या असलेल्या काही दिवसांसाठी मुंबईलला गेलेल्या केतकी लिमये म्हणाल्या, मुंबईमध्ये असताना एकदाही काॅलड्राप झाला नाही. मात्र पुण्यात सातत्याने हा त्रास हाेत अाहे. नाेकरीमुळे दरराेज अनेक लाेकांशी संपर्कात रहावे लागते. परंतु काॅलड्रापमुळे संवाद सातत्याने खंडीत हाेत असून मनस्ताप वाढत अाहे. डीजिटल इंडियाच्या गप्पा मारताना काॅलड्रापसारखी समस्या उद्भवणे यासारखा दुसरा विनाेद नाही. ट्रायने याबाबत तातडीने कार्यवाही करणे अपेक्षित अाहे. 

   यावर अायटी क्षेत्रातील तज्ञ दीपक शिकारपूर म्हणाले, नेटवर्क कंपन्यांचे पुरेसे टाॅवर शहरात नसल्याने या समस्या निर्माण हाेत अाहेत. नेटवर्क कंपन्यांनी अापल्या ग्राहकांनुसार टाॅवरची उभारणी करणे गरजेचे अाहे. त्याचबराेबर इमारतीवर टाॅवर उभारल्याने रेडिएेशनचा त्रास हाेत असल्याचे सांगितले जाते.त्यामुळे नागरिक इमारतींवर टाॅवर उभारण्यास परवानगी देत नसल्याचे चित्र अाहे. महापालिकेने नेटवर्क कंपन्यांसाठी टाॅवर पाॅलसी तयार करायला हवी. टेकड्यांवर या कंपन्यांना टाॅवर उभारण्याची परवानगी द्यायला हवी. जाेपर्यंत पुरेसे टाॅवर उभारण्यात येणार नाहीत ताेपर्यंत ही समस्या कायम राहिल. 

टॅग्स :PuneपुणेMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान