शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांसाठी मोबाइल अ‍ॅप

By admin | Updated: November 18, 2016 04:39 IST

मतदार आणि नागरिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने ट्रू व्होटर अ‍ॅप तयार केला आहे. त्यात प्रगणकांना मतदारांची माहिती भरता येणार आहे.

पिंपरी : मतदार आणि नागरिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने ट्रू व्होटर अ‍ॅप तयार केला आहे. त्यात प्रगणकांना मतदारांची माहिती भरता येणार आहे. त्यातून मतदार याद्यांसाठी लागणारा वेळ वाचणार आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणूक विभागाच्या वतीने भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृहात मतदार याद्यांविषयी प्रशिक्षण देण्यात आले. निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने म्हणाले, ‘‘मतदार याद्यांविषयक प्रशिक्षण आज देण्यात आले. मतदार याद्या अपडेट करताना प्रगणक घरोघरी जाऊन माहिती घेतात. त्याचा चार्ट भरून घेतात. नंतर हा चार्ट अपलोड केला जातो. नवीन अ‍ॅपची निर्मिती निवडणूक आयोगाने केली आहे. मतदार आणि नागरिकांसाठी हा अ‍ॅप विकसित केला आहे. मतदार याद्यांचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करून घेता येणार आहे. त्यावर होम स्क्रीन, त्यात मतदार चार्ट ज्या कर्मचाऱ्यांचे नियंत्रण अधिकाऱ्याचे आहे. त्याचा कोड देऊन लॉगीन करायचे आहे. त्यानंतर मतदारांचे स्थलांतर, राहत आहे किंवा मयत याविषयीची माहिती भरायची आहे. कंट्रोल चार्ट तयार करण्यासाठी इंटरनेटची गरज नाही. माहिती भरून पूर्ण झाल्यानंतर डाटा अपलोड करायचा आहे. त्यामुळे ज्या विभागाचे त्याच विभागात मतदार असतील.’’सहायक आयुक्त योगेश कडूसकर, सहायक आयुक्त मनोज लोणकर आदी उपस्थित होते. ट्रू व्होटर अ‍ॅप या नवीन अ‍ॅपविषयी कडूसकर यांनी माहिती दिली. (प्रतिनिधी)