शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळळा, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
2
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
3
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
4
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
5
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
6
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
7
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
8
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
9
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
10
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
11
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
12
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
13
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
14
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
15
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
16
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
17
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
18
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
19
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
20
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल

मनसेची बोट महापौरांच्या दालनात

By admin | Updated: November 21, 2015 04:08 IST

कात्रजच्या तलावात बोटिंग सुरू करावी, यासाठी महापालिका सभागृहात आणलेली बोट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सभाच तहकूब झाल्यानंतर सभागृहातून थेट महापौरांच्या दालनातच नेली.

पुणे : कात्रजच्या तलावात बोटिंग सुरू करावी, यासाठी महापालिका सभागृहात आणलेली बोट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सभाच तहकूब झाल्यानंतर सभागृहातून थेट महापौरांच्या दालनातच नेली. तिथे झालेल्या चर्चेनंतर महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी या विषयाची माहिती घेऊन नंतर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन मनसेच्या नगरसेवकांना दिले.कात्रज तलावातील बोटिंग गेल्या काही वर्षांपासून बंद आहे. या बोटिंगच्या संदर्भात ठेका देण्यावरून काही वाद असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पालिकेने हा ठेकाच बंद केला असून त्यामुळे बोटिंगही बंद आहे. ते सुरू करावे, अशी मागणी करीत मनसेच्या सदस्यांनी आज महापालिका सभागृहात एक कृत्रिम बोटच आणली. मात्र तहकूबीच्या सूचनेचा आधार घेत महापौरांनी सभा तहकूब केली. त्यामुळे आता या बोटीचे करायचे काय, असा प्रश्न मनसेच्या सदस्यांसमोर निर्माण झाला. महापौरांच्या आसनासमोरील टेबलावर ठेवलेली ही बोट पुन्हा खाली घेऊन काय करायचे, यावर त्यांच्यात बराच वेळ खलबत सुरू होते. (प्रतिनिधी) रूपाली पाटील-ठोंबरे यांनी यावर मार्ग काढत त्या बोटीतच बसकण मारली व अन्य सदस्यांना ती बोट महापौरांच्या दालनात घेऊन जाण्यास सांगितले. वसंत मोरे व अन्य सदस्यांनी त्याप्रमाणे सभागृहातून ही बोट दोरीने ओढत थेट महापौरांच्या दालनात नेली. दरवाजातून आत नेताना ती थोडी तुटली, मात्र तरीही रूपाली पाटील-ठोंबरे त्यात बसून होत्या. मोरे यांनी धनकवडे यांना बोटिंग बाबतची वस्तुस्थिती सांगितले. एकाही उद्यानात मुलांसाठी बोटिंगची सुविधा नाही. कात्रज तलावात ती सुरू करता येणे शक्य असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे अशी तक्रार त्यांनी केली. प्रशासनाने दिवाळीच्या सुट्टीत बोटिंग सुरू करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र पाळले नाही असे ते म्हणाले.