शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

हिंदी संदेशाला मनसेने फासले काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मनसेकडून सातत्याने मराठीच्या मुद्द्यांवरून आवाज उठविला जातो. याच खळखट्याक आंदोलने, मोर्चे यांच्यासह ‘मनसे’ने अमराठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मनसेकडून सातत्याने मराठीच्या मुद्द्यांवरून आवाज उठविला जातो. याच खळखट्याक आंदोलने, मोर्चे यांच्यासह ‘मनसे’ने अमराठी कंपन्यांना धडा शिकवला आहे. याच धर्तीवर पुण्यातील कोथरूडमधील कर्वेनगर चौकातील कै. नानासाहेब बराटे उड्डाणपुलाला सुशोभीकरणाच्या नावाखाली हिंदी भाषेत संदेश लिहिण्यात आले आहेत. याविरुद्ध कोथरूड विभाग मनसेने आवाज उठवत गुरुवारी (दि.११) आंदोलन केले. यावेळी कर्वेनगर येथील उड्डाणपुलाला काळे फासून निषेध करण्यात आला.

शहरात विविध ठिकाणी सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. मात्र सुशोभीकरणाच्या दरम्यान मराठी भाषेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत कर्वेनगर उड्डाणपुलाच्या इथे आंदोलन केले. यावेळी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मनसेचे कोथरूड विभाग अध्यक्ष सुधीर धावडे म्हणाले की, मनपाने हिंदी भाषा कामकाजात अधिकृतपणे वापरण्याचा एखादा नवा कायदा केला आहे? का? की हळूहळू हिंदी भाषा किंवा इतर कोणतीही परप्रांतीय भाषा पुणेकरांच्या माथी मारून ती मनावर बिंबवण्याचा कावा सत्ताधाऱ्यांनी आखला आहे? एक तर हिंदी त्यात अशुद्ध हिंदी. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कधीही सहन करणार नाही. पुणेकरांवर जबरदस्तीने लादलेल्या हिंदी भाषेचा आम्ही जाहीर विरोध करतो व निषेधही करतो.