शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चाळकवाडी टोलनाका आमदारांनी केला बंद, स्टंटबाजी असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 01:51 IST

पुणे-नाशिक महामार्गाच्या अपूर्ण कामांच्या व बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न मिळाल्याने जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी त्यांच्या समर्थकांसह शुक्रवारी चाळकवाडी टोलनाक्यावर शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत हा टोलनाका बंद केला.

पिंपळवंडी  - पुणे-नाशिक महामार्गाच्या अपूर्ण कामांच्या व बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न मिळाल्याने जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी त्यांच्या समर्थकांसह शुक्रवारी चाळकवाडी टोलनाक्यावर शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत हा टोलनाका बंद केला.पुणे-नाशिक महामार्गाच्या अपूर्ण असलेल्या कामांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने येत्या रविवारी (दि. १५) चाळकवाडी टोलनाका बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर शुक्रवारी आमदार शरद सोनवणे यांनी त्यांच्या रायगड या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या टोलनाक्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की पुणे-नाशिक महामार्गावरील आळेफाटा, नारायणगाव, कळंब, मंचर, खेड बाह्यवळणे व पुलाची कामे प्रलंबित आहेत. तसेच चाळकवाडी भटकळवाडी येथील शेतकºयांचे हक्काचे पैसे कोर्टात अडकले आहेत. अर्धवट कामांमुळे या प्रश्नाबाबत वारंवार बैठका घेऊन प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला. १५ मेपर्यंत आम्ही काम चालू करू; अन्यथा तुम्ही टोलनाका बंद करा, अशा सूचना केंद्रीय व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी बैठकीत दिल्या होत्या. परंतु पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलेल्या विनंतीचा मान ठेवून अजून एक महिना वाट पाहण्याची तयारी दाखवली. विरोधकांनी सन २०१५ ते २०१८ या कालावधीमध्ये शेतकºयांकडे चुकूनही लक्ष दिले नाही. यामुळे हा टोलनाका बंद करण्याचा अंतिम इशारा दिला होता. हा टोलनाका आज ना उद्या बंद होणार आहे, ही बाब विरोधकांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी आधी टोलनाका बंद करण्याचे राजकारण केले व श्रेयवादाची लढाई सुरू केल्याची टीका सोनवणे यांनी केली. महामार्गाच्या रस्तारुंदीकरणाचे काम करणाºया ठेकेदार कंपनीस वारंवार सांगूनही केंद्रीय वाहतूकमंत्रीनितीन गडकरी, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, जिल्हाधिकारी व शेतकºयांची फसवणूक करीत असेल तर त्यांना टोल वसूल करू दिला जाणार नाही, असे म्हणत टोल बंद केला. महामार्गाची संपूर्ण कामे झाल्याशिवाय टोलनाका सुरू करू दिला जाणार नाही, असा इशाराही सोनवणे यांनी यावेळी दिला.नारायणगाव : आमदार शरद सोनवणे यांच्यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही, त्यांनी अनेक वेळा टोल बंद करून पुन्हा सेटलमेंट करून टोलनाका सुरू केला आहे. राष्ट्रवादीचे रविवारचे (दि. १५) टोल बंद आंदोलन होणारच, अशी माहिती राष्ट्रवादीचे राज्य युवक उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी दिली.जनतेच्या हिताच्या कामासाठी राष्ट्रवादी पक्ष नेहमीच कटिबद्ध आहे. टोल बंदमुळे राजकीय स्टंट कोण करत आहे, हे जनतेला कळाले आहे. राष्ट्रवादीने जनतेच्या हितासाठी टोल बंद आंदोलनाला जनतेचा वाढता प्रतिसाद हा सोनवणेंना सलत असून सर्वसामान्यांनी पुकारलेल्या १५ जुलैच्या आंदोलनाचे श्रेय घेण्यासाठीच सोनवणे यांनी राजकीय स्टंट केला आहे. राष्ट्रवादीने २६ जून २०१८ ला टोल बंद आंदोलनाचे निवेदन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हाधिकारी, टोलचालक यांना दिले आहे.

टॅग्स :tollplazaटोलनाकाPuneपुणे