शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

आंबेगाव-जुन्नरसाठी ‘मिशन पेसा’ - आयुष प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 02:16 IST

आदिवासी गावांना पेसा अंतर्गत मिळालेला निधी ३१ डिसेंबरपर्यंत खर्च झाला पाहिजे. ग्रामसभा घेऊन गरजेनुसार विकासकामांचे प्रस्ताव पंचायत समितीमार्फत आदिवासी विभागाकडे सादर करावेत. यासाठी उपजिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आंबेगाव व जुन्नर तालुक्यात ‘मिशन पेसा’ ही मोहीम सुरू केली आहे.

डिंभे - आदिवासी गावांना पेसा अंतर्गत मिळालेला निधी ३१ डिसेंबरपर्यंत खर्च झाला पाहिजे. ग्रामसभा घेऊन गरजेनुसार विकासकामांचे प्रस्ताव पंचायत समितीमार्फत आदिवासी विभागाकडे सादर करावेत. यासाठी उपजिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आंबेगाव व जुन्नर तालुक्यात ‘मिशन पेसा’ ही मोहीम सुरू केली आहे. आदिवासी गावांना समक्ष भेटी देऊन पेसा अंतर्गत झालेल्या विकासकामांची पाहणी ते स्वत: करणार आहेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी आंबेगाव तालुक्यातील राजेवाडी व जांभोरी या गावांना भेटी देऊन आढावा घेतला. गावागावांत ग्रामसभा घेऊन आवश्यकतेनुसार मूलभूत सुविधांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी मार्गदर्शन केले.आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील आदिवासी गावांना पेसा कायद्याअंतर्गत गावागावांत मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी गावातील लोकसंख्येच्याप्रमाणात दरवर्षी निधी उपलब्ध होतो. मात्र, मिळालेला हा निधी योग्य वेळी योग्य त्या कामांवर खर्च होत नसल्याने अनेक ग्रामपंचायतींकडे पेसाचा निधी पडून राहत आहे. यामुळे आदिवासी गावांतील मूलभूत सुविधांसाठी पुरविण्यात येत असलेल्या निधीचा पुरेपुर उपयोग होत नसल्याची बाब लक्षात आल्यामुळे उपजिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जुन्नर व आंबेगाव तालुक्यात याबाबत मिशन पेसा या नावाने मोहीम सुरू केली आहे.या मोहिमेअंतर्गत दोन्ही तालुक्यासाठी गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन टीम तयार करण्यात आल्या आहेत. या टीममध्ये गटविकास अधिकारी, पेसा समन्वयक, प्रकल्प कार्यालयाचे नियोजन अधिकारी, वरिष्ठ निरीक्षक यांचा यात समावेश आहे. टीमसोबत उपजिल्हाधिकारी स्वत: आदिवासी गावांना भेटी देऊन पेसाअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेत आहेत.या वेळी पेसाचा निधी खर्च न झाल्याने ग्रामपंचायतींच्या खात्यावर पडून असल्याने त्यांनी खंत व्यक्त केली. हा अखर्चित निधी ३१ डिसेंबरपर्यंत खर्च करण्याबाबत निर्देश दिले. यावेळी राजेवाडी येथील ग्रामस्थांनी घनकचरा व्यवस्थापन व साबळेवाडी ते पोखरी जोडरस्त्याच्या डागडुजीसाठी निधीची मागणी केली. तर जांभोरी येथील ग्रामस्थांनी कळंबई रस्ता, काळवाडी ते भोकटेवाडी रस्त्यासाठी निधीची गरज असल्याचे सांगीतले.यावेळी आंबेगाव तालुका गटविकास अधिकारी राहुल काळभोर, जिल्हा पेसा समन्वयक विनोद इंगोले, प्रकल्प कार्यालयाचे नियोजन अधिकारी दिलीप पिंपळेकर, वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल चव्हाण, राजेवाडीचे सरपंच बेलनाथमहाराज जांभोरी-राजेवाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, ग्रामसेवक उपस्थित होते.प्रस्ताव सादर करा- राजेवाडी व जांभोरी येथील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले, की गावागावांत ग्रामसभा घेवून रस्ते, पाणीपुरवठा, पशुसंवर्धन, या बरोबरच गावाला आवश्यक असणाºया मूलभूत सुविधांची गरजेनुसार क्रमवारी ठरवून प्रस्ताव गटविकास अधिकारी यांच्याकडे ६ मेपर्यंत सादर करावेत.- वैयक्तिक स्वरूपाच्या लाभाचे प्रस्तावही सादर करावेत, हे प्रस्ताव आदिवासी विभागाकडे प्राप्त झाल्यावर तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या