शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

Pune: मिसिंगची नोंद असलेला व्यक्ती सापडला; मित्रांनीच त्याला गाडला होता

By नम्रता फडणीस | Updated: August 13, 2024 18:12 IST

भात लागवडीच्या बहाण्याने तरूणाला मित्रांनी राजगड तालुक्यात नेले होते

पुणे: सिंहगड पोलिस स्टेशन येथे मिसिंगची नोंद असलेला व्यक्ती सापडला. मित्रांनीच त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी राजगड तालुक्यातील रांजणे गावात खड्डयात् गाडले असल्याचा धक्कादायक् प्रकार समोर आला आहे. भात लागवडीच्या बहाण्याने तरूणाला मित्रांनी राजगड तालुक्यात नेले. मग विजेच्या मनोऱ्यावरील तार कापून चोरी करण्यास प्रवृत्त केले. दुर्देवाने मनोऱ्यावरुन तोल जाऊन तरुण कोसळल्याने गंभीर जखमी झाला होता. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला असून, सिंहगड रस्ता पोलिसांनी दोघांना अटक केली.    बसवराज मंगळुरे (वय २२ सध्या रा. वडगाव बुद्रुक, मूळ रा. सोलापूर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रुपेश अरुण येनपुरे (वय २५), सौरभ बापू रेणुसे (वय २५, दोघे रा. पाबे, ता. राजगड, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.    बसवराज मित्र सौरभ रेणुसे याच्यासोबत १२ जुलै रोजी भात लावणीसाठी राजगड तालुक्यातील पाबे गावात गेला होता. १३ जुलै रोजी बसवराज आणि त्याचा मित्र सौरभ रेणुसे, रुपेश येनपुरे यांच्यासोबत रांजणे गावातील विजेच्या मनोऱ्यावर चढुन तार कापत चोरीचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी तार तुटून बसवराज काेसळला. गंभीर जखमी झालेल्या बसवराजला सौरभ आणि रुपेश यांनी उपचारासाठी रूग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. दोघांनी बसवराजला रुग्णालयात नेले नाही. त्याला पाबे घाटाजवळील जमिनीत खड्डा करुन जिवंत गाडले. दरम्यान, बसवराज बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या आईने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली. तक्रारीत तिने रूपेश येनपुरे आणि सौरभ रेणूसे यांच्यावर संशय व्यक्त केला होता.     सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर, संतोष भांडवलकर, सुरेश जायभाय यांनी रूपेशला ताब्यात घेतले. पोलिसांंचे पथक त्याला घेऊन पाबे गावात पोहोचले. वेल्हे पोलीस, तसेच निवासी नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत सौरभने पोलिसांना खड्डा दाखविला. बसवराजला खड्ड्यात पुरण्यात आल्याचे उघड झाले. पोलिसांनी संबंधित गुन्हा वेल्हे पोलिसांकडे सोपविला आहे. आरोपी सौरभ आणि त्याचा मित्र रुपेश यांना वेल्हे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस उपायुक्त संभाजी कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन निकम, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, सुरेश जायभाय, निकेतन निंबाळकर, सतीश नागुल, सुहास गायकवाड,सचिन गायकवाड, नवनाथ वणवे, शिवाजी क्षीरसागर, राजाभाऊ वेगरे, उत्तम तारु यांनी ही कामगिरी केली.

टॅग्स :PuneपुणेFortगडSinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीसDeathमृत्यूelectricityवीज