शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
6
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
9
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
10
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
11
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
12
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
13
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
14
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
15
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
16
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
17
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
18
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
19
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
20
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग

आईने घडविली लेक

By admin | Updated: March 7, 2015 23:08 IST

आपल्या सारखं जगणं मुलीच्या वाट्याला येऊ नये, तिन चांगलं शिकावं, मोठं व्हावं हा विचार उराशी बाळगून एका मातेने स्वत: खस्ता खात, शेतात काबडकष्ट करीत मुलीला शिकवले.

घोडेगाव : आपल्या सारखं जगणं मुलीच्या वाट्याला येऊ नये, तिन चांगलं शिकावं, मोठं व्हावं हा विचार उराशी बाळगून एका मातेने स्वत: खस्ता खात, शेतात काबडकष्ट करीत मुलीला शिकवले. आणि बघता बघता या मायेची लेक डॉ. शकुंतला काळे राज्याच्या शिक्षण व संशोधन प्रशिक्षण परिषदेची संचालिका झाली. आपली आई लक्ष्मीबाई मोतीराम काळे हिच्या कष्टामुळे आपण या पदापर्यंत पोहोचले त्या आपल्या आईची ओळख शेवटपर्यंत राहावी म्हणून डॉ. शकुंतला काळे यांनी लग्नानंतरही आपले आडनाव ‘गावडे’ न बदलता ‘काळे’च ठेवले आहे, तर स्त्री-पुरूषामधील भेदभाव मिटावा, यासाठी आईला अग्निडाग त्यांनी स्वत: दिला. डॉ. शकुंतला काळे या सध्या राज्याच्या शिक्षण व संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या संचालिका म्हणून पुण्यामध्ये काम पाहात आहेत. राज्यातील एवढ्या मोठ्या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी संभाळताना आपण या पदापर्यंत ज्या आईमुळे पोहोचलो, त्या आईची आठवण त्यांना सदैव असते. डॉ. शकुंतला काळे या नऊ वर्षांच्या असताना त्यांचे पितृछत्र हरवले. लक्ष्मीबार्इंना ही एकुलती एक मुलगी आयुष्यातील जगण्याचा आशेचा किरण होता. या मातेने आपली जिरायती शेती कष्टाने करून कुटुंब चालवले. सन १९७८ मध्ये गिरवलीच्या पाझर तलावावर काम करून मुलीची दहावीची फी भरली. त्याच पैशात या आईने मुलीला परकर-पोलकं शिवलं व हेच परकर-पोलकं घालून शकुंतला काळे यांनी दहावीची परीक्षा दिली. या परीक्षेत त्या मुलींमध्ये पहिल्या आल्या. शिक्षणाचे महत्त्व जाणणाऱ्या निरक्षर मातेने आपल्यासारखं जगणं मुलीच्या वाट्याला येऊ नये म्हणून स्वत: शेतात काबाडकष्ट करून मुलीला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. डॉ. शकुंतला काळे यांनीही आईचे स्वप्न पूर्ण करण्याचे ध्येय डोळ्यां समोर ठेवून शिक्षण घेतले. डी़ एड. पूर्ण झाल्यानंतर, घोडेगाव येथील जनता विद्या मंदिर शाळेत शिक्षिका म्हणून काम केले. डॉ. काळे यांनी शिक्षिका म्हणून काम करता करता स्पर्धा परीक्षा दिल्या व सन १९९३ मध्ये अधिकारी झाल्या. सोलापूर येथे माध्यमिक उपशिक्षणाधिकारी, एससीईआरटीच्या अधिव्याख्यात्या, पुणे महानगर पालिकेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय सचिव, एससीईआरटीच्या सहसंचालिका असे शिक्षण क्षेत्रातील जबाबदारीचे पद त्यांनी भूषविले आहे.