शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

देशात धर्माच्या नावाखाली उपद्रवाचे वातावरण, मीरा बोरवणकर यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 03:36 IST

देशात धर्माच्या नावाखाली उपद्रवाचे वातावरण आहे, घटनेत सर्व धर्मांना समान न्याय आहे. मात्र, सध्या प्रत्यक्षात तसे चित्र दिसत नसल्याची खंत माजी पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी व्यक्त केली. राजकीय दबाव येणे हा कामाचाच भाग आहे.

पुणे -  देशात धर्माच्या नावाखाली उपद्रवाचे वातावरण आहे, घटनेत सर्व धर्मांना समान न्याय आहे. मात्र, सध्या प्रत्यक्षात तसे चित्र दिसत नसल्याची खंत माजी पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी व्यक्त केली. राजकीय दबाव येणे हा कामाचाच भाग आहे. दबाव हा चांगला किंवा वाईट असतो. चांगल्या दबावाचा वापर योग्य रीतीने आपल्या कामात करता येऊ शकतो. त्यासाठी सद्सद्विवेकबुद्धीने विचार केला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.मीरा बोरवणकर यांनी लिहिलेल्या ‘माझ्या आयुष्याची पानं’ या पुस्तकाच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये त्या बोलत होत्या. युनिक अ‍ॅकॅडमी आणि विश्वकर्मा पब्लिकेशन्स यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी युनिक अ‍ॅकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव, विश्वकर्मा पब्लिकेशनचे विशाल सोनी, यूपीएससी परीक्षेत यश मिळवलेला विद्यार्थी पीयूष साळुुंखे आदी उपस्थित होते.बोरवणकर म्हणाल्या, ‘‘केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (यूपीएससी) उत्तीर्ण होण्यासाठी एकाग्रता, सातत्य आणि परिश्रमांची गरज असते. ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होता येईल असे नाही. मात्र, पालक सतत नकारात्मक विचार करतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होते. त्यामुळे पालकांचे समुपदेशन करण्याची जास्त गरज आहे.’’मला स्वत:ला एकेकाळी इंग्रजी बोलता येत नव्हते. इंग्रजी येत नसल्याचा न्यूनगंड वाटायचा. अनेकदा हॅलो म्हणायचे की हाय म्हणायचे, हेही समजत नव्हते. मात्र, कष्ट आणि सातत्याच्या जोरावर प्रत्येक उणीव दूर करता येते. विद्यार्थ्यांनी स्मार्ट पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. त्यासाठी एकाग्रता गरजेची आहे. सरकारी नोकरी म्हणजे आरामाचे काम नाही. या क्षेत्रात यायचे, तर पॅशन असली पाहिजे. निष्ठेने काहीतरी करायची इच्छाशक्ती असली पाहिजे. पगार, नोकरी, मान-सन्मानासाठी यूपीएससी नाही, असे बोरवणकर यांनी स्पष्ट केले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पीयूष साळुंखे याने मनोगत व्यक्त केले, तर तुकाराम जाधव यांनी प्रास्ताविक केले.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या