आसखेड : चाकण येथून मध्यवस्तीत वर्दळीच्या ठिकाणावरून शाळा सुटल्यानंतर एका साडेचार वर्षाच्या लहान बालकास अनोळखी इसमाने पळवून नेल्याची घटना आज दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान घडली. याबाबतची फिर्याद अश्विनी प्रवीण कोळेकर यांनी चाकण पोलिसात दिली आहे.चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण शहरात मध्यवर्ती ठिकाणी विद्या निकेतन प्रशाला असून आज दुपारी बाराच्या दरम्यान शाळा सुटल्यानंतर रुद्र प्रवीण कोळेकर (वय साडेचार वर्षे, रा. मेदनकरवाडी चाकण) हा शाळेच्या बाहेर आल्यानंतर एका अनोळखी इसमाने त्यास पळवून नेले. याबाबतची फिर्याद रुद्रची आई अश्विनी कोळेकर यांनी चाकण पोलिसात दिली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक महेश मुंढे व सहकारी करीत आहेत.
अल्पवयीन मुलाला पळवले
By admin | Updated: March 25, 2017 03:27 IST