शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Mini Lockdown In Baramati : बारामती तालुक्यात संचारबंदीचे नियम फाट्यावर; प्रशासनाचे दुर्लक्ष तर नागरिक संतप्त  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 19:25 IST

विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या अधिक : ग्रामपंचायतीने कारवाई करण्याची गरज

सांगवी : एकीकडे कोरोनाच्या महामारीला रोखण्यासाठी शासन कडक निर्बंध लागू करत आहे.मात्र दुसरीकडे काही मोठे व्यावसायिकच अणूपालन करत या निर्बंधाला धुडकावून लावत असल्याचे समोर आले आहे. सांगवी ( ता.बारामती ) येथे काही अपवाद वगळता छोटे व्यावसायिकच फक्त प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करताना दिसून येत आहेत. 

मात्र गावातील काही हॉटेल, किराणा दुकाने व इतर बडे व्यावसायिकच संचारबंदीचे आदेश पायदळी तुडवत आहेत. यामुळे छोट्या व्यावसायिकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. हातावर पोट असणारे व्यावसायिक प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे आपली दुकाने बंद करत आहेत. त्याचवेळी मोठे दुकानदार  विनामास्क वावरतात तसेच वेळेच्या  बंधनांचे पालन केले जात नाही. कुणाच्या पाठिंब्यावर बेधकपणे आपली दुकाने थाटून बसत आहेत.असा सवाल सर्वसामान्य नागरिक करू लागले आहेत. यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने देखील गावातील दुकानदारांवर वचक ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना राबवणे गरजेचे आहे.

पुणे जिल्ह्यात दिवसा जमावबंदी तर सायंकाळी सहा वाजण्याच्या पुढे संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. तसेच गेल्या दोन ते तीन दिवसांपासून प्रसारमाध्यमांतून जनजागृती देखील केली जात आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने माहिती दिल्यानंतर देखील छोटे व्यावसायिक संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करत आहेत.परंतू, काही मोठे व्यावसायिक आपल्याला काहीच माहिती नसल्याचा आव आणत दुकाने सहानंतर देखील बेधडकपणे सुरू ठेवत असल्याचे रविवारी आणि सोमवारी  निदर्शनास आले.

फलटण -बारामती रस्त्यावर व्यावसायिक सहा वाजल्यानंतर आपला पसारा आवरून घरी जात आहेत. मात्र, काही हॉटेल तसेच गावातील मुख्य बाजार पेठेतील बडे व्यावसायिक नियमांचे उल्लंघन करत आहे. फलटण रस्त्यावरील ६ नंतरही आपली दुकाने सुरूच ठेवत आहेत. यामुळे आता ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने अशा त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. 

 

 

 

टॅग्स :Baramatiबारामतीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPoliceपोलिसgram panchayatग्राम पंचायत