शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
3
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
4
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
5
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
6
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
7
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
8
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
9
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
10
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
11
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
12
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
13
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
14
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
15
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
16
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
17
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
18
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
19
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
20
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)

खाणमालकांचे धाबे दणाणले

By admin | Updated: October 15, 2015 00:59 IST

हवेली महसूल विभागाने गौणखनिजाची अनधिकृतपणे वाहतूक करणाऱ्या २०० पेक्षा जास्त गाड्यांवर कारवाई केली. त्यामुळे बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांची अक्षरश

लोणी काळभोर / वाघोली : हवेली महसूल विभागाने गौणखनिजाची अनधिकृतपणे वाहतूक करणाऱ्या २०० पेक्षा जास्त गाड्यांवर कारवाई केली. त्यामुळे बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांची अक्षरश: पळता भुई थोडी झाली. खाणमालकांचे धाबे दणाणले आहेत. हवेलीचे तहसीलदार दगडू कुंभार, महसूल नायब तहसीलदार समीर यादव यांच्या पथकाने तालुक्यात विविध ठिकाणी कारवाई केली.बहुतांश खाणमालकांनी रॉयल्टी भरलेली नाही, परवान्यांचेही नूतनीकरण केलेले नाही. काही खाणमालकांनी रॉयल्टीबाबत दिलेले धनादेशही वटलेले नाहीत. याकामी संबंंधितांना वारंवार सूचना व नोटीसही बजावण्यात आल्या होत्या. मात्र, याकडे दुर्लक्षच होत असल्यामुळे ही धडक कारवाई करण्यात आली.अनधिकृत वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये खडी व क्रशसँड मोठ्या प्रमाणावर आढळून आली. वाहतूक करताना गौणखनिज आच्छादित नव्हते. काही वाहनधारकांकडे असलेल्या परवाना पावत्यांची तपासणी करण्यात आली. ज्या वाहनधारकांनी शासनाच्या नियमानुसार दंडात्मक रक्कम भरली आहे, त्यांचे वाहन दंड आकारून सोडण्यात आले.ज्या वाहनधारकांकडे कोणत्याही स्वरूपाचा परवाना आढळून आला नाही व दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ केलेली आहे, त्या वाहनचालकांचा जबाब, पंचनामा, जप्तीनामा तयार करून संबंधित वाहने लोणी कंद पोलिसांकडे सुपूर्द केल्याची माहिती महसूल अधिकाऱ्यांनी दिली. खराडी बायपासजवळ ३० गाड्या कारवाई करण्यासाठी ताब्यात घेतल्या. वाघोलीतील वाघेश्वर मंदिर परिसरात ४५ वाहने ताब्यात घेतली असून, बहुतांशी वाहनांमध्येच गौणखनिज ताडपत्रीने झाकलेले नसल्याचे आढळून आले. लोणी कंद परिसरात २० तर खेड शि२वापूर परिसरात ३९ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. (वार्ताहर)